UPSC CDS I 2020 चा अंतिम निकाल जाहीर Rojgar News

UPSC CDS I 2020 चा अंतिम निकाल जाहीर Rojgar News

UPSC CDS Final Result 2020: केंद्रीय क सेवा आयोग (Union Public Service Commission) ने कंबाइंड डिफेंस सर्व्हिसेस (CDS) 2020 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. जे उमेदवार UPSC CDS (I) 2020 OTA परीक्षेत उपस्थित होते, ते UPSC चे अधिकृत संकेतस्थळ च्या माध्यमातून निकाल डाऊनलोड करू शकतात. इंटरव्ह्यूनंतर एकूण १४७ उमेदवार पात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, UPSC CDS (I) 2020 चे इंटरव्ह्यू चेन्नईत संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड बोर्ड (SSB) द्वारे एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आले होते. इंटरव्ह्यूनंतर एकूण १४७ उमेदवार पात्र ठरले आहेत. UPSC CDS उमेदवारांचे गुण ३० दिवसांसाठी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध राहतील. निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत हे गुण उपलब्ध होतील. मेरिट लिस्ट कशी तयार होणार? यूपीएससीने देखील मेरिट यादी जारी केली आहे. यूपीएससी सीडीएस 2020 मेरिट करण्यासाठी उमेदवारांची वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली नाही. सर्व उमेदवारांच्या जन्मतारखेची पडताळणी आणि निवड प्रक्रिया संरक्षण मुख्यालयाद्वारे केली जाईल. यूपीएससी पूर्व परीक्षा तारीख यूपीएससीने नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC preliminary exam) करोना व्हायरस (COVID 19) महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थगित केली होती, ही परीक्षा आता ऑक्टोबर २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली आहे. UPSC CDS (I) Final Result: कसा तपासाल निकाल? १: यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. २: होमपेज वर, 'UPSC CDS 2020 OTA Final Result' लिंक वर क्लिक करा. ३: यूपीएससी सीडीएसची एक पीडीएफ उघडेल. ४: येथे आपले नाव आणि रोल नंबर तपासून घ्या. ५: निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fHsXOe
via nmkadda

0 Response to "UPSC CDS I 2020 चा अंतिम निकाल जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel