Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ५ जून, २०२१, जून ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-05T08:47:23Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

cbse 12th practical exam: लेखी परीक्षा रद्द , प्रॅक्टिकलचे काय होणार ?जाणून घ्या Rojgar News

Advertisement
class 12 marking scheme latest update: सीबीएसई बारावीचे (CBSE )थिअरी पेपर( लेखी परीक्षा) रद्द करण्यात आल्यानंतर आता प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक) परीक्षेबद्दल (Practical Exam) प्रश्न उपस्थित होत आहेत. करोना काळात देखील काही विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा सुरु आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. बारावी प्रॅक्टिकल परीक्षांचे काय होणार ? यासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने(CBSE) माहिती दिली आहे. सीबीएसईने शाळांना बारावी प्रॅक्टिकल परीक्षा थांबवण्याचा पर्याय दिला आहे. शाळांनी यासंदर्भात आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा असे बोर्डाचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज यांनी सांगितले. यासंदर्भात शाळांना संबंधित राज्यांचे नियम मानावे लागतील. कोणत्या राज्यात किंवा जिल्हा प्रशासनाची परवानगी नसेल तर शाळा प्रॅक्टिकल परीक्षा घेऊ शकत नाहीत. परवानगी मिळाली तर सुरक्षेचे पालन करुन परीक्षा घेऊ शकता असेही ते पुढे म्हणाले. भारद्वाज ने सांगितले की, सीबीएसई लवकरच बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता असेसमेंट धोरण(CBSE 12th Assessment Policy 2021) तयार करणार आहे. यामध्ये प्रॅक्टिकल परीक्षांवर पर्याय देखील देण्यात आला आहे. इवॅल्यूशन पॉलिसी येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा थांबवू शकता. हा निर्णय शाळांना घ्यायचा आहे असे भारद्वाज म्हणाले. सीबीएसईने आम्हाला प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण अपलोड करण्यास सांगितले आहेत. म्हणून आम्ही परीक्षा पूर्ण करण्यासाठी ११ जूनपर्यंतचा वेळ दिल्याचे शाळांचे म्हणणे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uVRUeh
via nmkadda