'या' विद्यार्थ्यांची कॉलेजची सर्व फी होणार माफ! Rojgar News

'या' विद्यार्थ्यांची कॉलेजची सर्व फी होणार माफ! Rojgar News

Fees news: दिल्ली विद्यापीठाने (DU) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा दिल्ली विद्यापीठाच्या फीशी संबंधित आहे. विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये देखील हा निर्णय लागू होणार आहे. दिल्ली विद्यापीठाने म्हटले आहे की ज्या विद्यार्थ्यांनी २०२० या वर्षात आता पर्यंत कोविड-19 महामारी () मुळे आपले एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क विद्यापीठ माफ करणार आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी (Delhi University) चे डीन बलराम पानी यांनी मीडियाला सांगितले की यासाठी सर्व महाविद्यालयांना पत्र लिहून एक सर्वे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी करायची आणि ती सोमवारपर्यंत विद्यापीठाला द्यायची आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे सर्व १०० % टक्के शुल्क माफ केले आहे. या विद्यार्थ्यांना (DU Exam Fees) यापुढे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अधिकाऱ्यांनुसार, दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत तीन प्रकारची महाविद्यालये येतात. एक जे ट्रस्टद्वारे चालवले जाते, दुसरे जे विद्यापीठाद्वारे चालवले जाते आणि तिसरे जे दिल्ली सरकार (Delhi Govt) द्वारे पूर्ण किंवा आंशिक रूपात मिळालेल्या निधीतून चालवले जाते. डीयूच्या महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि आपल्या स्तरावर हा निर्णय लागू करण्याच्या दिशेने काम करण्याविषयी कळवले आहे. एका प्राचार्यांनी अशी माहिती दिली की, शुल्काचे दोन भाग असतात - एक कॉलेज कंपोनंट आणि युनिव्हर्सिटी कंपोनंट. विद्यापीठाचे कुलगुरू संपूर्ण शुल्कापैकी केवळ विद्यापीठाचा भाग माफ करू शकतात. दुसरीकडे काही महाविद्यालयांनी आपल्या पातळीवर विद्यार्थ्यांची यादी बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2T0YPFA
via nmkadda

0 Response to "'या' विद्यार्थ्यांची कॉलेजची सर्व फी होणार माफ! Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel