NTPC Recruitment through GATE 2021 : एनटीपीसीमध्ये २८० पदांवर भरती, १० जूनपर्यंत करा अर्ज Rojgar News

NTPC Recruitment through GATE 2021 : एनटीपीसीमध्ये २८० पदांवर भरती, १० जूनपर्यंत करा अर्ज Rojgar News

through 2021: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (National Thermal Power Corporation,NTPC) मध्ये एग्झिक्यूटिव्ह इंजीनियर ट्रेनी पोस्ट (Executive Engineer Trainee Posts)च्या पदांवर भरती आहे. याअंतर्गत २८० पदांवर भरती केली जाईल. NTPC च्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना गेट (GATE) परीक्षा पास असणं गरजेचं आहे. तसेचऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ntpc.co.in वर पूर्ण माहिती मिळेल. एप्लीकेशन पोर्टलनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २१ मे २०२१ मध्ये सुरु होईल. तर १० जून २०२१ पर्यंत ही प्रक्रिया सुरु राहील. एनटीपीसीतर्फs जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार ही भरती इलेक्ट्रीकल, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रूमेंटेशनच्या डिपार्टमेंटमध्ये आहे. या पदावर निवड झालेल्यांना ४० हजार ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत पगार असेल. या तारखा लक्षात ठेवा एनटीपीसीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख -२१ मे २०२१ एनटीपीसीमध्ये अर्ज जमा करण्यासाठी अंतिम तारीख- १० जून २०२१ ऑनलाईन अर्ज एनटीपीसीतर्फे जाहीर केलेल्या नोटीफिकेशननुसार इच्छुक आणि योग्य उमेदवार २१ मे ते १० जून २०२१ पर्यंत www.ntpccareer.net वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता. या विभागांत नियुक्ती इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रूमेंटेशन विभाग या पदांवर नियुक्ती केली जाईल. यासाठी उमेदवाराचे वय २७ वर्षांच्या आत असणे गरजेचे आहे. अशी होईल निवड गेट स्कोर २०२१ च्या आधारावर ग्रुप डिस्कशन (जीडी) आणि मुलाखतीसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. या भरीत प्रक्रियेची अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wYTRI9
via nmkadda

0 Response to "NTPC Recruitment through GATE 2021 : एनटीपीसीमध्ये २८० पदांवर भरती, १० जूनपर्यंत करा अर्ज Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel