Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ८ जून, २०२१, जून ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-06-08T06:47:18Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अमरावती विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांना अखेर सुरुवात Rojgar News

Advertisement
म. टा. वृत्तसेवा, अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या () हिवाळी २०२०च्या पारंपारिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा मंगळवार ८ जूनपासून सुरू होत आहेत. अमरावती विभागातील तब्बल २६४ केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. परीक्षेपूर्वी परीक्षा विभागाने ३७ विषयांच्या प्रश्नपत्रिका रवाना केल्या आहेत. करोना संक्रमणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्या आहेत. हिवाळी उलटल्यानंतर आता उन्हाळ्यात हिवाळी परीक्षा होत आहेत. हिवाळी-२०२०च्या अभियांत्रिकी, औषधशास्त्र व विधी शाखेच्या परीक्षा आटोल्या आहेत. सुमारे एक लाख विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. यानंतर आता पारंपारिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलडाणा अशा पाच जिल्ह्यांतील २६४ केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. परीक्षेत पाचही जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ऑनलाइनची जबाबदारी महाविद्यालयांची ऑनलाइन परीक्षा घेण्याची जबाबदारी अमरावती विद्यापीठाने पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयावर सोपविली आहे. यासाठी अनेक महाविद्यालयांनी गुगल फॉर्म तर काहींनी वेगवेगळ्या अ‍ॅपचा वापर केला आहे. अडचण नाही : डॉ. देशमुख अमरावती विद्यापीठाने हिवाळी-२०२०च्या अभियांत्रिकी, औषधशास्त्र व विधी शाखेच्या परीक्षा घेतल्या आहेत. उर्वरित पारंपारिक परीक्षांना सुरुवात होणार आहे. ऑनलाइन परीक्षेची यंत्रणा महविद्यालयांनी तयार केली आहे. आतापर्यंत कोणतीही समस्या उद्भवलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी येऊ नये याची काळजी घेण्यात येत असल्याची प्रतिक्रिया विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. जिल्हानिहाय केंद्र - अमरावती : १११ - अकोला : ५५ - बुलडाणा : ८५ - यवतमाळ : ८५ - वाशीम : ३६ एकूण : २६४


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z4iDbX
via nmkadda