Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २३ जून, २०२१, जून २३, २०२१ WIB
Last Updated 2021-06-23T11:47:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आयआयटी मद्रासचे स्टार्टअप्स आणि रिस्क फायनान्सिंगवर रिसर्च सेंटर Rojgar News

Advertisement
And :इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)मद्रासने ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन स्टार्ट-अप्स आणि रिस्क फायनान्सिंग’(CREST) कोर्स सुरु केला आहे. यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना नाविण्य, उद्योजकता आणि रिस्क कॅपिटल या विषयात शैक्षणिक आणि विचारशील नेतृत्व मिळणार आहे. तसेच भारतीय स्टार्ट अप्स व उपक्रमांवर डेटा रिपॉझिटरी तयार होईल. हा अभ्यास संशोधक आणि धोरणकर्त्यांसाठी उच्च स्तरीय प्रकाशनासाठी उपयोगी येणार आहे. हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे प्रोफेसर तरुण खन्ना यांनी सामाजिक विश्वास आणि भारताची उद्योजकता क्षमता 'या विषयावर मंगळवारी सीआरईएसटीच्या उद्घाटन प्रसंगी भाषण दिले. हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे प्रोफेसर तरुण खन्ना म्हणाले, “विकसनशील देशांतील उत्तम कल्पना असलेले उद्योजक नेहमीच्या विश्वासावर अवलंबून राहू शकत नाहीत. बिल्डिंग फाउंडेशनचा कायदा, नियामक निरीक्षणे आणि सरकारी प्रकल्प हे विकसित जगात होत राहतात. या कल्पक घटकांचे अस्तित्व गृहित धरून चालावे लागेल. त्याऐवजी, या देशांमधील स्मार्ट उद्योजकांना मानसिकता बदलण्याची गरज आहे. केवळ ती तयार करण्यावरच नव्हे तर तशी परिस्थितीत तयार करण्यावरही लक्ष केंद्रित केले पाहीजे. २०११ ते २०२० या कालावधीत भारतीय तंत्रज्ञानाच्या स्टार्ट-अप्समध्ये ६८ अब्ज डॉलर्स (४ लाख ७६ हजार कोटी रुपये) गुंतवणूकीमुळे शैक्षणिक संशोधन हे उद्योजकतेत टिकवून ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकते. “वैज्ञानिक आणि व्यावसायिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. लॅबमधून छान तंत्रज्ञान येत आहे पण यामध्ये नवकल्पनांचा अभाव असल्याचे प्रोफेसर तरुण खन्ना म्हणाले. CREST चे व्हिजन नावीन्यपूर्ण, उद्योजकता आणि जोखीम भांडवलाची क्षेत्रे समाविष्ट असलेले अभ्यासपूर्ण संशोधनात शिकवणे हा क्रेस्ट अभ्साक्रमाचा मुख्य उद्देशआहे. निर्मिती, विकास आणि नाविन्य, उद्योजकता या क्षेत्रांमध्ये अभ्यासपूर्ण संशोधन करण्यात गुंतलेल्या संशोधनाचे अग्रगण्य केंद्र म्हणून जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त करणे. क्रॉस कंट्री सहयोगात्मक संशोधन, परिणामकारक स्टार्ट-अप्स आणि व्हेंचर यामुळे निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते. स्टार्ट-अप वर पुरावा संश्लेषण आणि पॉलिसी तयार करणारे आणि व्यावसायिकांना माहिती देण्यासाठी नाविन्यपूर्ण परिसंस्था बनणे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U110d6
via nmkadda