
in local language: इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि भविष्यात शिकू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये हा इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषदेने ११ भाषांमधील इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमला परवानगी दिली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करताना अडचणी येत होत्या. आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये हा अभ्यासक्रम करता येणार असल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भातील माहिती दिली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद () ने ११ प्रादेशिक भाषांमध्ये बी.टेक अभ्यासक्रमाला परवानगी दिल्याचे ते म्हणाले. या भाषांमध्ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, मल्याळी, बंगाली, आसमी, पंजाबी आणि उड़िया या भाषांचा समावेश आहे. प्रादेशिक भाषांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रोत्साहन देत असतात असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातर्फे विविध वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांना सशक्त बनविण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत असल्याचेही ते म्हणाले. याआधी उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी या अभ्यासक्रमाच्या पुढाकारबद्दल प्रतक्रिया दिली. आठ राज्यांच्या १४ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये नव्या शैक्षणिक वर्षासाठी निवडक शाखांमध्ये उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यानंतर उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांचे आभार मानले. मराठीतून इंजिनीअरिंग शिका मुंबई विद्यापीठातर्फे लवकरच मराठी भाषेमध्ये इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. स्थानिक भाषेमध्ये इंजिनअरिंग शिक्षण द्यावे असे निर्देश ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICT)ने इंजिनीअरिंग महाविद्यालयांना दिले आहेत. त्यानुसार मुंबई विद्यापीठात मराठी भाषेतून अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. याला मंजूरी देण्यात आली आहे. स्थानिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यात यावे अशी शिफारस एआयसीटीने सर्व महाविद्यालयांना केली होती. मुंबई विद्यापीठातर्फे या प्रस्तावाला परवानगी मिळाल्याने विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यांना आपल्या बोलीभाषेत इंजिनीअरिंगचे धडे गिरवता येणार आहेत. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणारी इंजिनीअरिंग महाविद्यालये विद्यापीठाकडे मराठीत इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव पाठवू शकतात. त्या महाविद्यालयांना आाता मराठीतून इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची परवानगी देण्यात येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iqTTmI
via nmkadda
0 टिप्पण्या