TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CBSE 10th Result 2021: सीबीएसई दहावीचा निकाल लांबणीवर? जाणून घ्या अपडेट Rojgar News

10th Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, सीबीएसई (Central Board of Secondary Education, CBSE) ने दहावीचा निकाल २० जुलैला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. पण नव्या माहितीनुसार या निकालाची घोषणा होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टमधील वृत्तानुसार सीबीएसई दहावी निकालास उशीर लागू शकतो. यामागे दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे रिझल्ट तयार करण्यासाठी टॅब्युलेशन पॉलिसी तयार करण्यात आली आणि दिल्ली हायकोर्टमध्ये निकालाच्या पद्धतीबद्दल याचिका दाखल होणे हे दुसरे कारण असू शकते. टॅब्युलेशन पॉलिसीवर अनेक शाळांनी नाराजी दर्शविली आहे. शाळा यापेक्षा सोयीस्कर मॉडरेशन पद्धतीच्या प्रतिक्षेत आहेत. याशिवाय सीबीएसई दहावी रिझल्ट पॉलिसीचा आव्हान देत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. जर हायकोर्टाने ही याचिका स्वीकारली तर बोर्डाचे निकाल घोषित होण्याच्या तारखेला उशीर होऊ शकतो. कोर्टाच्या प्रक्रियेत वेळ जाऊन सुनावणीस वेळ जाऊन पर्यायाने निकालस उशीर होऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, निकाल वेळेवर जाहीर केले जातील असे बोर्डातील सुत्रांनी सांगितले. २० जुलैपर्यंत निकाल देण्यास बोर्ड कटीबद्ध आहे. सीबीएसई बारावी निकाल अधिकृत नोटीसनुसार ३० जुलैपर्यंत जाहीर होणार आहे. अधिकाऱ्यांनी निकालाच्या तारखेत बदल होण्यासंदर्भात कोणते भाष्य केले नाही. दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींनी आपल्या निकालाबद्दलची नवी माहिती पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे असे सांगण्यात आले आहे. सीबीएसई परीक्षांचा निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर उपलब्ध होईल. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त cbseresults.nic.in वर क्लिक करू शकतात. CBSE Result 2021: असा तपासा निकाल - CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल विद्यार्थ्याचा रोल नंबर, नाव आणि जन्मतारखेच्या सहाय्याने ऑनलाइन मिळवता येईल. - उमेदवारांना वर दिलेल्या संकेतस्थळांवर लॉग इन करावे लागेल, निकालाच्या पर्यायावर क्लिक करून विचारलेली माहिती भरावी लागेल. - CBSE इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ३०:३०:४० सूत्रावर आधारलेला असेल. विद्यार्थ्यांचे बारावीतले अंतर्गत मूल्यमापन, अकरावीच्या अंतिम परीक्षेतील गुण आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेतील सर्वोत्तम तीन विषयांचे गुण यावर आधारित निकाल तयार करण्यात येईल. - CBSE इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापन, शालेय स्तरावरील विविध परीक्षांमधील कामगिरी यावर आधारलेला असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AYQ4xm
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या