Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ७ जुलै, २०२१, जुलै ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-07T08:47:13Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 10th,12th Result: शाळांमध्ये होणार सरप्राइज इन्स्पेक्शन, १२ जुलैपर्यंत बोर्डाकडे रिपोर्ट Rojgar News

Advertisement
CBSE 10th,12th Result: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ने करोना प्रादुर्भावामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. मूल्यांकन पद्धतीने याचा निकाल लावला जाणार असून शाळांमध्ये याची तयारी सुरु आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या टॅब्युलेशन पॉलिसीचे पालन शाळांमध्ये योग्यरितीने होतेय का? यावर नजर ठेवली जाणार आहे. यासाठी अधिकारी शाळांना अचानक भेट देणार आहेत. यासंदर्भात शाळांना अगोदर कोणती माहिती दिली जाणार नाही. बोर्डातर्फे रिजनल डायरेक्टर आणि ऑफिसर्सना आपल्या अधिकार क्षेत्रातील शाळांना अचनाक भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रिजनल अधिकाऱ्यांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील सीबीएसईतर्फे लवकरच निर्देश दिले जाणार आहेत. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी होणारी सीबीएसई दहावी आणि बारावी परीक्षा रद्द करावी लागली. शाळांतर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार केले जात आहेत. हे निकाल किती पारदर्शक आणि निष्पक्ष आहेत? हे पाहण्यासाठी महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. यासाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेली टॅब्युलेशन पॉलिसी योग्य रितीने वाचावी, समजून घ्यावी आणि त्यानंतर शाळांमध्ये निरीक्षणास जावे असे निर्देश सीबीएसई बोर्डाने दिले आहेत. कोणत्या शाळांना भेट देणार? प्रत्येक श्रेणीतील शाळेचे निरिक्षण स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहे. ज्यामध्ये खासगी, सरकारी, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालयांचा देखील समावेश असणार आहे. अधिकाऱ्यांद्वारे निरिक्षण झाल्यानंतर १२ जुलै दुपारी १२ पर्यंत हा अहवाल बोर्डाला पाठवण्यात येणार आहे. बोर्ड लवकरात लवकर दहावी, बारावीच्या रिझल्टची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत हे निरीक्षण सुरु आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2V6FnbC
via nmkadda