
Syllabus: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ने करोना काळाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. वर्ष २०२१-२२ च्या दहावी आणि बारावीसाठी विशेष मूल्यांकन पद्धतीची घोषणा करुन परीक्षा दोन भागांमध्ये विभागली गेली. पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये असेल. तर दुसरी टर्म परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ मध्ये असेल. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी घेण्यात आलेल्या पुढाकारचे शिक्षक आणि पालकवर्गातून स्वागत होतंय. दरम्यान अभ्यासक्रम कपातीबाबत शिक्षक वर्गातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सीबीएसईने पुढच्या वर्षात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी विशेष मूल्यांकन पद्धतीची घोषणा केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सीबीएसईने सेकेंडरी आणि सिनिअर सेकेंडरी इयत्तांच्या बोर्ड परीक्षा दोन भागात सुधारित अभ्यासक्रमाच्या आधारे आयोजित करण्याची घोषणा ५ जुलैला केली होती. विद्यार्थी आणि शिक्षक या अभ्यासक्रमाच्या प्रतिक्षेत आहेत. कमी केलेला अभ्यासक्रम लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर अपलोड केला जाईल अशी आशा व्यक्त होतेय. दुसरीकडे शिक्षकांनी गेल्यावर्षी ३० टक्के अभ्यासक्रमात कपात करण्याऐवजी यावर्षी मोठी कपात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. करोना प्रादुर्भावाचा झालेला परिणाम पाहता बोर्डाकडून अभ्यासक्रमाचे परीक्षण सुरु आहे. हा अभ्यासक्रम दोन भागांमध्ये विभागला जाईल. ५० टक्के अभ्यासक्रमात टर्म १ ची परीक्षा आणि ५० टक्के अभ्यासक्रमात टर्म २ ची परीक्षा घेतली जाणार आहे. अभ्यासक्रमात कपात होण्याच्या घोषणेनंतर शाळांतर्फे दहावी आणि बारावीच्या नव्या सीबीएसई अभ्यासक्रमाची वाट पाहिली जात आहे. बहुतांश शिक्षकांनी अभ्यासक्रमात ३० टक्के कपातीऐवजी जास्त अभ्यासक्रम कपात व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आम्ही गेल्यावर्षी सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर बोर्डाने ३० टक्के अभ्यासक्रम कपातीची घोषणा केली होती असे एका खासगी शाळेतील मॅथ्सचे शिक्षक म्हणाले. त्यामुळे अभ्यासक्रमातील काही भागापेक्षा पूर्ण धडा वगळावा. अभ्यासक्रमाला वेग देण्यास याचा फायदा होईल आणि विद्यार्थ्यांना शिकविण्यात देखील सोपे जाईल असे ते म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dZqfmS
via nmkadda
0 टिप्पण्या