Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ९ जुलै, २०२१, जुलै ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-07-09T06:47:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

सांगलीच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात भरती, ६० हजार मिळेल पगार Rojgar News

Advertisement
Recruitment: सांगलीच्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध पदांची भरती निघाली आहे. याअंतर्गत आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४० जागा भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता देखील ठरवून देण्यात आली आहे. तसेच पात्रताधारक उमेदवारांकडून दिलेल्या नमुन्यातील अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असणे गरजेचे आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपचारात्मक अंमलबजावणीच्या दृष्टीने एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ही भरती तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने मानधन देऊन केली जाणार आहे. यासाठी शासनाच्या नियमांनुसार थेट मुलाखत होणार आहे. यासाठी अर्जासोबत वयाचा पुरावा, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, एम.एस.सी रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, उमेदवाराच्या सहीचा पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी पात्र होणाऱ्या उमेदवारास दरमहा ६० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आरोग्य विभाग, दूसरा मजला, जिल्हा परिषद, सांगली या पत्त्यावर द्यावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक १४ जुलै २०२१ आहे. या तारखेपर्यंत अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्यात येईल. ऑनलाइन अर्ज पाठविण्यासाठी कोणती लिंक देण्यात आली नाही. पोस्टाद्वारे किंवा कुरिअरद्वारे कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच १४ जुलैनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. मिळालेल्या अर्जानुसार १६ जुलैला थेट मुलाखत होणार आहे. भरतीसंदर्भातील अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. याची लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्व वाचून त्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. दिलेल्या लिंकवरुन उमेदवार अर्ज डाऊनलोक करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UtrofL
via nmkadda