Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १ जुलै, २०२१, जुलै ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-07-01T12:47:11Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CLAT 2021: परीक्षा केंद्रांची अपडेटेड लिस्ट जारी, दुरुस्तीही करता येणार Rojgar News

Advertisement
CLAT 2021 Updates: कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज () ने CLAT 2021 साठी परीक्षा केंद्रांची अद्ययावत यादी जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी क्लॅट २०२१ साठी रजिस्ट्रेशन केले आहे, ते आपल्या परीक्षा केंद्रांच्या पसंतीक्रमात बदल करू शकतात. आवश्यकता असेल तेव्हा ते आपल्या अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये दुरुस्तीदेखील करू शकतात. या दुरुस्तीसाठी अखेरची मुदत ४ जुलै २०२१ आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट, वर जाऊन नोटीस तपासू शकतात. २३ जुलैला २ ते ४ वाजता ही परीक्षा होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रात नियमांचे काटकोर पालन केले जाणार आहे. देशभरात कोविड-१९ ची स्थिती पाहता CLAT 2021 च्या परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय २३ जुलै २०२१ रोजी घेण्यात आला. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचा प्रवास कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. या व्यतिरिक्त, परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावरील उमेदवारांची संख्यादेखील कमी होणार आहे. पुढील पद्धतीने आपले परीक्षा केंद्र पसंतीक्रम अपडेट करा - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट, consortiumofnlus.ac.in ला भेट द्या. - यानंतर होमपेज वर उपलब्ध क्लॅट २०२१ लिंक वर क्लिक करा. - आता एक नवे पेज उघडेल. - येथे उमेदवारांनी आपला मोबाइल नंबर आणि पासवर्ड नोंदवावा आणि लॉगइन करावे. - आता Edit Application वर क्लिक करावे. - यानंतर प्रेफरन्स टॅब वर जा. - आता आवश्यकतेनुसार, तीन परीक्षा केंद्रांचे पसंतीक्रम अपडेट करा. - केलेले बदल सेव्ह करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Aii7aQ
via nmkadda