Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T11:47:44Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CLAT Admit Card 2021: क्लॅट परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड लवकरच Rojgar News

Advertisement
2021: देशभरातील विविध विधी अभ्यासक्रमाच्या संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कन्सोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज ()कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) अर्थात क्लॅट परीक्षेचे आयोजन करते. २०२१-२२ या वर्षाच्या प्रवेशांकरिता क्लॅट परीक्षा २३ जुलै २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना १४ जुलै २०२१ पासून अॅडमिट कार्ड उपलब्ध होणार आहेत. सीएनएलयूने सोमवारी यासंबंधीची माहिती दिली होती. अन्य सर्व उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार असले तरी उत्तर पूर्व राज्यांसाठी प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड उपलब्ध करण्यात येणार नाहीत. पुढील पद्धतीने करा डाऊनलोड पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी यूजी अॅडमिट कार्ड २०२१ आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पीजी अॅडमिट कार्ड २०२१ उमेदवार सीएनएलयूची ऑफिशियल वेबसाइट, consortiumofnlus.ac.in येथून डाउनलोड करू शकतील. उमेदवारांनी वेबसाइट वर भेट दिल्यावर क्लॅट अकाउंटला लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर डाऊनलोड अॅडमिट कार्ड पर्यायावर क्लिक करा. अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. प्रिंटआऊट घेतल्यानंतर सॉफ्ट कॉपीदेखील उमेदवारांनी सेव्ह करावी. क्लॅट अॅडमिट कार्ड 2021 साठी हेल्पलाइन जारी सीएनएलयूने क्लॅट एडमिट कार्ड 2021 मध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास किंवा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन जारी केली आहे. विद्यार्थी अधिकृत ईमेल आईडी - clat@consortiumofnlus.ac.in वर ईमेल करून किंवा ०८०-४७१६२०२० या क्रमांकावर कार्यालयीन दिवसात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत फोन करून मदत घेऊ शकतात. ऑफिशियल वेबसाइटवरून डाऊनलोड केलेल्या अॅडमिट कार्ड २०२१ मध्ये उमेदवारांचे रोल नंबर, परीक्षा केंद्राची तारीख आदी माहितीसह कोविड-१९ महामारी संबंधित निर्देश सीएनएलयूमार्फत जारी केले जातील, यांचे पालन करणे अनिवार्य आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yTkIX6
via nmkadda