TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

JEE Main 2021: तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांदरम्यानचा कालावधी वाढवा, विद्यार्थ्यांची मागणी Rojgar News

JEE Main 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)तर्फे घेण्यात येणाऱ्या मेन्स २०२१ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन सत्रांमधील कालावधी वाढवण्याची मागणी केली. जेईई मेनची एप्रिल आणि मे सत्राच्या परीक्षा करोना प्रादुर्भावामुळे होऊ शकली नाही. आता ही परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. परीक्षेचे दोन्ही सत्र १४ दिवसांच्या आत संपविले जाणार आहेत. ६ जुलैला जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार तिसऱ्या सत्राची परीक्षा २० ते २५ जुलै २०२१ आणि चौथ्या सत्राची परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान होणार आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या सत्रादरम्यानचा कालावधी वाढवून पाहीजे आहे. दोन्ही सत्रांच्यामध्ये केवळ एका दिवसाचाच कालावधी मिळतोय. यामुळे कालावधी वाढवण्याची मागणी केली जात आहे. जेईई मेन परीक्षी १३ भाषेंमध्ये आयोजित केली जात आहे. जेईई मेन परीक्षेचे आयोजन करोना काळात केले जात आहे. अशावेळी परीक्षेसाठी केंद्रांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. यावेळी अंडर ग्रॅज्युएट इंजिनीअरिंग प्रवेश परीश्रा चार सत्रांमध्ये आयोजित केली जात आहे. पहिले दोन सत्र-फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आयोजित करण्यात आले होते. पण देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल आणि मेची परीक्षा स्थगित करावी लागली. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि एसओपीचे पालन करण्यासाठी एनटीएने जेईई मेन (एप्रिल आणि मे) सत्रासाठी परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ केली आहे. याआधी ६६० परीक्षा केंद्र होती. आता ही संख्या वाढवून ८२८ करण्यात आली आहे. एनटीएनने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ६ लाखांहून अधिक उमेदवारांनी जेईई मेन एप्रिल २०२१ साठी नोंदणी केली आहे. नोंदणी रि-ओपन केल्याने उमेदवारांची संख्या वाढणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i55uYn
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या