TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

GAT-B, BET 2021: बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची नोंदणी सुरू Rojgar News

GAT-B, BET 2021:देशभरातील विद्यापीठे आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांमधील बॉयोटेक्नोलॉजी आणि अन्य सबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) द्वारे ग्रॅज्युएट अॅप्टिड्यूड टेस्ट – बॉयोटेक्नोलॉजी (GAT-B) आणि डॉक्टोरल रिसर्च फेलोशिप – डीबीटी ज्युनियर रिसर्च फेलोशिप (DBT-JRF) परीक्षा घेण्यात येतात. बॉयोटेक्नोलॉजी प्रवेशांची पात्रता निर्धारित करणाऱ्या बॉयोटेक्नोलॉजी इलिजिबिलिटी टेस्ट (BET), 2021 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही परीक्षा १४ ऑगस्टला होणार आहे. जीएटी-बी 2021 किंवा बीईटी 2021 साठी अर्ज करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांसाठी एनटीएच्या पोर्टलवर dbt.nta.ac.in येथे उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येईल. जीएटी-बी 2021 किंवा बीईटी 2021 साठी अर्ज करण्याची अखेरची मुदत ३१ जुलै २०२१ आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना यंदा केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांसाठी 'जीएटी-बी' ही परीक्षा घेतली जाते. देशातील नामवंत विद्यापीठांमध्ये या परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रवेश मिळतात. यंदा ही परीक्षा १४ ऑगस्टला होऊ घातली आहे. ही 'कम्प्युटर बेस्ड टेस्ट' (सीबीटी) असून, त्यासाठी तीन तासांचा कालावधी देण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) ठरवण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर १४ ऑगस्टला सकाळी ९ ते १२ या कालावधीत ही परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने (एमसीक्यू) प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम हा 'एनटीए'च्या वेबसाइटवर सविस्तरपणे देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ecFXvi
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या