Advertisement

GAT-B/BET 2021: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी NTA ने GAT-B/BET 2021 च्या नोंदणी प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना याची माहिती देण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करुन यासाठी नोंदणी करता येणार आहे. NTA ने GAT-B/BET 2021 साठी ७ जुलै २०२१ ला नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट-बायोटेक्नोलॉजी ()/ बायोटेक्नोलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट (BET)साठी नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया ३१ जुलै २०२१ संपणार आहे. उमेदवार nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे. उमेदवार केवळ ऑनलाइन माध्यमातून GAT-B/BET २०२१ या दोन्हीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी पोस्टाच्या माध्यमातून अर्ज पाठवू नये. जाहीर केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, इतर कोणत्याही माध्यमातून आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिकृत वेबसाइटवर या नोंदणी प्रक्रियेसंदर्भात महत्वपूर्ण तारखा देण्यात आल्या आहेत. GAT B ची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असणार आहे. तर BET ची परीक्षा दुपारी ३ ते संध्याकाळी ६ पर्यंत असणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटर आधारित असणार आहे. परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न इंग्रजी भाषेतून असणार आहेत याची देखील उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. जे उमेदवार GAT-B किंवा BET साठी अर्ज करु इच्छित आहेत. त्यांना परीक्षेसाठी १२०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवार अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/PwD वर्गातील असेल तर त्याच्यासाठी ६०० रुपये शुल्क असणारआहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hJPWZP
via nmkadda