Advertisement

Out: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)ऑफिस अटेंडंट पदांवरील भरतीसाठी आयोजित केलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेचा निकाल रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी ही भरती परीक्षा दिली आहे ते आपला निकाल किंवा opportunities.rbi.org.in वर पाहू शकतात. वेबसाइट वर लेखी परीक्षेत तात्पुरते शॉर्टलिस्ट केले गेलेल्या उमेदवारांचे रोल नंबर असलेली यादी उपलब्ध करण्यात आली आहे. पुढील पद्धतीने पाहा निकाल - निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट, opportunities.rbi.org.in वर जावे. - यानंतर होमपेजवर दिलेल्या करंट व्हेकन्सी सेक्शन मधील रिझल्ट लिंक वर क्लिक करा. - आता एक नवे पेज उघडेल. - येथे संबंधित परीक्षेच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. - आता पुन्हा तुम्ही एका नव्या पेजवर जाल. - येथे प्रोव्हिजनली शॉर्टलिस्टेड कँडिडेट्सच्या रोल नंबरची लिंक उपलब्ध असेल. - या लिंकच्या माध्यमातून उमेदवार आपला निकाल तपासू शकता. - आवश्यकता असल्यास निकाल डाऊनलोड करून प्रिंट आऊट घेऊन ठेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे ऑफिस अटेंडंट पदांवरील भरतीसाठी २४ फेब्रुवारी २०२१ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया या दिवसापासून सुरू झाली होती. अर्ज करण्याची अखेरची मुदत १५ मार्च २०२१ होती. ऑनलाइन परीक्षा ९ एप्रिल आणि १० एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आली होती. परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना ३१ मार्च २०२१ रोजी अॅडमिड कार्ड उपलब्ध करून देण्यात आले होते. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ऑफिस अटेंडंटची एकूण ८४१ पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा आणि लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्ट (LPT) टेस्टच्या आधारे केली जाईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांनी पुढील टप्प्यात लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्ट द्यावयाची आहे. विस्तृत माहिती रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hOcGIa
via nmkadda