Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २६ जुलै, २०२१, जुलै २६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-26T07:43:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IBPS Exam 2021: बँकिंग क्षेत्रात करिअर करायचंय? 'अशी' करा परीक्षेची तयारी Rojgar News

Advertisement
- प्रा. संजय मोरे गेली दहा वर्षं आयबीपीएस हे नाव सर्वपरिचित झालेलं आहे. आयबीपीएसमार्फत (IBPS Exam 2021) सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ऑफिसर आणि क्लेरिकलच्या जागा भरण्यात येतात. त्याशिवाय रीजनल रूरल बँकांमध्ये ही अधिकारी आणि लिपिक पदासाठी होणारी भरती प्रक्रिया (Bank 2021ibps) आयबीपीएसमार्फतच होते. स्टेट बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड किंवा काही को-ऑपरेटीव्ह बँकांमधील भरतीदेखील आयबीपीएसमार्फतच होते. म्हणजेच या बँकांसाठी होणारी भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा पूर्णपणे आयबीपीएसमार्फतच घेतली जाते. आज आपण आयबीपीएसमार्फत होणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांनीमधील लिपिक पदासाठीच्या भरतीविषयीची माहिती घेऊ या... इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) आपल्या सहयोगी ११ बँकांमधील क्लेरिकल कॅडरच्या सन २०२२-२३ मधील एकूण रिक्त ५,८३० पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (CRP Clerks-XI) ऑगस्ट २०२१/सप्टेंबर/ऑक्टोबर २०२१मध्ये आयोजित करणार आहेत. सहयोगी बँका- बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक. ० पदाचं नाव- क्लार्क ० पात्रता- अर्ज करण्याच्या दिवशी पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. ० वयोमर्यादा- १ जुलै, २०२१ रोजी २० ते २८ वर्षं (इमाव-३१ वर्षं, अजा/अज-३३ वर्षं, दिव्यांग-३८/४१/४३ वर्षं, विधवा/परित्यक्ता/ज्युडिशियली सेपरेटेड महिला- ३५/३८/४० वर्षं) ० प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग- सहयोगी बँका अजा/ अज/ दिव्यांग/ अल्पसंख्यांक/ माजी सैनिक उमेदवारांना प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग मुंबई, नागपूर, पुणे, पणजी इ. केंद्रांवर १६ ऑगस्ट, २०२१पासून आयोजित करणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी. करोनाच्या स्थितीमध्ये सुधार न झाल्यास प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग घेतलं जाणार नाही. ऑनलाइन प्रीलिमिनरी एक्झामिनेशन २८-२९ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर २०२१ रोजी होईल. ० ऑनलाइन मुख्य परीक्षा- ३१ ऑक्टोबर, २०२१ ० निवडपद्धती- सीआरपी ऑनलाइन परीक्षा (अ) पूर्व परीक्षा (१) इंग्रजी भाषा- ३० प्रश्न, ३० गुण, (२) न्यूमरिकल अॅबिलिटी- ३५ प्रश्न, ३५ गुण (३) रिझनिंग अॅलबिलिटी- ३५ प्रश्न, ३५ गुण. प्रत्येक टेस्टसाठी वेळ प्रत्येकी २० मिनिटं दिली जातील. एकूण ६० मिनिटं. (ब) मुख्य परीक्षा- १९० प्रश्न, २०० गुण, वेळ १६० मिनिटे (१) जनरल/फायनान्शियल अवेअरनेस- ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३५ मिनिटं (२) जनरल इंग्रजी- ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटं (३) रिझनिंग अॅबिलिटी अँड कम्प्युटर अॅप्टिट्यूड- ५० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटं, (४) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड- ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटं. प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iTj9SW
via nmkadda