NTPC Recruitment 2021: विविध पदांवरील भरतीसाठी ६ ऑगस्टपर्यंत करा अर्ज Rojgar News

NTPC Recruitment 2021: विविध पदांवरील भरतीसाठी ६ ऑगस्टपर्यंत करा अर्ज Rojgar News

NTPC : एनटीपीसीमध्ये एक्झिक्युटिव्ह आणि सिनीअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती निघाली आहे. याअंतर्गत एकूण २२ पदं भरली जाणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट @ntpc.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. ६ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एनटीपीसीने यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार एक्झिक्युटिव्हच्या १९ आणि सीनीअर एक्झिक्युटिव्हच्या ३ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. तसेच कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह पदावर ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इंजिनीअरिंग डिग्रीमध्ये ६० टक्क्यांहून अधिक गुण असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त एमबीएमध्ये पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट असणे गरजेचे आहे. एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मॅकेनिकल आणि पॉवर इंजिनीअरिंगमध्ये बीई, बीटेक असणे गरजेचे आहे. तसेच सिनीअर एक्झिक्युटिव्ह सोलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इंजिनीअरिंग डिग्रीमध्ये ६० टक्के असणे गरजेचे आहे. एक्झिक्युटिव्ह क्लीन टेक्नोलॉजीमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विषयात ६० टक्के गुणांसह इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री असणे गरजेचे आहे. याशिवाय एमटेक आणि पीएचडीची डिग्री असणे देखील गरजेचे आहे. तसेच इतर पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे. वयोमर्यादा एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. तसेच सिनीअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर् आणि एक्झिक्युटिव्ह क्लीन टेक्नोलॉजी पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kWHD0c
via nmkadda

0 Response to "NTPC Recruitment 2021: विविध पदांवरील भरतीसाठी ६ ऑगस्टपर्यंत करा अर्ज Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel