TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

IBPS क्लर्क पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात Rojgar News

द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डाने () क्लर्क पदाच्या भरतीसाठी सामायिक भरती प्रकियेंतर्गत (CRP Clerks-XI)ऑनलाइन नोंदणीला सुरुवात केली आहे. या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेची लिंक आयबीपीएसने अॅक्टिव्ह केली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डाच्या अधिकृत स्थळावरून नोंदणी करावी. IBPS Clerk 2021 Recruitment साठी नोंदणी आणि अर्जाची थेट लिंक या वृत्तातही पुढे देण्यात आली आहे. महत्त्वाच्या तारखा - ऑनलाइन नोंदणीला सुरूवात - १२ जुलै २०२१ नोंदणीची अखेरची मुदत - १ ऑगस्ट २०२१ अर्जाच्या नोंदणीची अखेरची मुदत - १ ऑगस्ट २०२१ अर्ज प्रिंट करण्याची अखेरची मुदत - १ ऑगस्ट २०२१ ऑनलाइन अर्जशुल्क भरणे - १२ जुलै ते १ ऑगस्ट २०२१ IBPS Clerk 2021 Recruitment साठी पुढील पद्धतीने करा अर्ज - १. संस्थेची अधिकृत वेबसाइट वर जा २. होमपेजवरील IBPS Clerk Exam नोटिफिकेशनवर क्लिक करा. ३. आता न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. ४. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बेसिक डिटेल्स भरा आणि यूजर आयडी, पासवर्ड जनरेट करा. ५. यूजर आयडी आणि पासवर्डसह लॉगइन कर ६. ऑनलाइन अर्ज भरा. ७. आवश्यक ती कागदपत्रे व फोटो, स्वाक्षरी अपलोड करा. ८. ऑनलाइन शुल्क भरा आणि रिसिट डाऊनलोड करा. ९. भविष्यातील रेफरन्ससाठी भरलेल्या अर्जाची एक प्रत घेऊन ठेवा किंवा अर्ज डाऊनलोड करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hA4axL
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या