Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १९ जुलै, २०२१, जुलै १९, २०२१ WIB
Last Updated 2021-07-19T06:45:04Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ICAR Recruitment 2021: यंग प्रोफेशनल पदांवर भरती, २०जुलैपर्यंत करा अर्ज Rojgar News

Advertisement
ICAR : इंडियन काऊन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च ( Indian Council of Agricultural Research, ICAR) ने यंग प्रोफेशनल(Young Professional)या पदांवरील भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. आयसीएआर अंतर्गत एकूण १४ पदं भरली जाणार आहेत. जे उमेदवार यासाठी अर्ज करु इच्छितात ते अधिकृत वेबसाइट https://icar.org.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. शैक्षणिक पात्रता आयसीएआरने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार मान्यताप्राप्त संस्थेतून बीकॉम किंवा बीबीए किंवा बीबीएस, सीए इंटर किंवा आयसीडब्ल्यूए इंटर किंवा सीएस इंटर असणे गरजेचे आहे. यामध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराकडे किमान १ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ४५ वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सवलत मिळणार आहे. आयसीएआरने भरती संदर्भात एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार मिळालेल्या अर्जांची तपासणी केली जाणार आहे. यानंतर निवडल्या गेलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी आमंत्रित केले जाऊ शकते. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट https://icar.org.in/ वर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. अंतिम तारीख २० जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शेवटची तारीख निघून गेल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच अर्ज करताना नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. यामध्ये काही चुकीचे आढळल्यास तर अर्ज रिजेक्ट केला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kyT79Y
via nmkadda