Advertisement

CSEET Result 2021: कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स परीक्षेचा (Company Secretary Executive Entrance Test, CSEET 2021 result) निकाल आज २१ जुलै २०२१ रोजी जाहीर होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Institute of Company Secretaries of India, ICSI) दुपारी ३ वाजता icsi.edu या वेबसाइटवर जाहीर केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, ते आपला निकाल अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन तपासू शकतात. या व्यतिरिक्त या वृत्तात पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करत निकाल पाहू शकतात. ICSI : निकाल असा पाहा कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी उमदेवारांनी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जावे. यानंतर होम पेज वर, निकालाच्या सेक्शन वर क्लिक करा. आता एक नवी विंडो उघडेल. आता येथे लॉगिन करून आपला रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आदी माहिती भरा. यानंतर निकाल स्क्रीन वर दिसेल. निकाल डाऊनलोड करा आणि निकालाची एक प्रिंट भविष्यातील संदर्भासाठी घेऊन ठेवा. १० जुलै रोजी झाली होती परीक्षा आयसीएसआयने सर्टिफिकेट कोर्स प्रवेशांसाठी देशभरात १० जुलै २०२१ रोजी परीक्षा आयोजित केली होती. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी १२ वीची परीक्षा दिली होती, तेही या परीक्षेला बसण्यास पात्र आहेत. परीक्षेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले होते. आता निकाल जाहीर होणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. ICSI CSEET परीक्षेचे आयोजन सर्टिफिकेट एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी केले जाते. यावर्षी ICSI ने यूजी आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी CSEET ची अनिवार्यता अट रद्द केली होती. पदवीधर उमेदवार आता एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमांना थेट प्रवेश घेऊ इच्छितात. ICSI च्या एका पूर्वीच्या नोटीसनुसार, भारतात किंवा परदेशात कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात ५० टक्के गुणांसह पीजी अभ्यासक्रमांना थेट प्रवेश घेता येतो. मात्र यावर्षी १२ वी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी परीक्षा अनिवार्य आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wYMmAx
via nmkadda