Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १५ जुलै, २०२१, जुलै १५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-15T14:47:34Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MAH LLb 5-Years CET 2021 च्या अर्जांना मुदतवाढ Rojgar News

Advertisement
MAH LLb 5-Years CET 2021: पाच वर्षांच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट(MAH LLb 5-Year CET) साठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्याची विंडो आता २० जुलै रोजी बंद होणार आहे. यापूर्वी १२ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार होते. ज्या विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल लागला असेल किंवा जे बारावीच्या निकालाची वाट पाहत आहेत ते पाच वर्षाच्या इंटिग्रेटेड कोर्ससाठी अर्ज करु शकतात. अर्जदारांनी llb5cet2021.mahacet.org वर ऑनलाइन अर्ज पाठवायचा आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पाच वर्षाच्या इंटिग्रेटेड कोर्ससाठी निवडले जाणार आहे. एमएएच लॉ मंडळाच्या राज्य सीईटी सेलच्या वेबसाइटवर यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. लॉचे विद्यार्थी आणि कॉलेजच्या मागणीवरुन पाच वर्षाच्या MAH-L.L.B.5Yrs (Five Year Integrated Course)सीईटी २०२१ साठी अर्ज भरण्यासाठी तारीख वाढविण्यात आल्याचे यात म्हटले आहे. MAH LLb 5-Year CET 2021: असा करा अर्ज राज्य सीईटीची अधिकृत वेबसाइट llb5cet2021.mahacet.orgला भेट द्या MHT CET 2021 link लिंकवर क्लिक करा नावे आणि इतर माहिती भरा सिस्टीममधून लॉगिन करा MHT CET अर्ज भरा आणि सबमिट करा MAH-LLb 5-year CET 2021 ही परीक्षा राज्यातील निवडक केंद्रांमध्ये एकावेळी अनेक सत्रांमध्ये ऑनलाइन माध्यमातून होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. MAH LLb 5-Year CET ची परीक्षा तारीख आणि प्रवेश पत्र मिळण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या दिवशी सत्रानुसारऑनलाईन सीईटीला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. दिलेल्या सत्रापेक्षा वेगळ्या सत्रात उमेदवाराला परीक्षा देता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्र, ठिकाण आणि सत्र बदलता येणार नाही असेही सांगण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xJgEbY
via nmkadda