Advertisement

SSC Result Link: दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल थोड्या वेळात जाहीर होणार आहे. २०२१ च्या दहावी परीक्षा रद्द झाल्यानंतर मूल्यमापन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. यानुसार नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक गुण ग्राह्य धरले गेले आहेत. माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयानुसार गुण देण्यात आले आहेत. बातमीत दिलेल्या ४ स्टेप्स फॉलो करा आणि काही क्षणातच निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयानुसार निकाल वेबसाइटवर उपलब्ध असेल. दहावीच्या परीक्षेसाठी ९ लाख ९ हजार ९३१ मुलं आणि ७ लाख ४८ हजार ६९३ मुलींनी नोंदणी केली होती. एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेसाठी होते. असा पाहा निकाल निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा तुमचा सीट नंबर टाइप करा आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका तुमच्या स्क्रीनवर निकाल दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिट काढून ठेवा कुठे पाहाल निकाल? https://ift.tt/2U7pMIW या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे. मंडळाचा दहावीचा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल पाहण्याची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. सन २०२१ च्या दहावीच्या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. निकालाची प्रिंटही विद्यार्थ्यांना घेता येईल. यंदा करोनामुळे ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ifrWy1
via nmkadda