
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल आज, शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. अशा प्रकारे निकाल जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. निकालाबाबतचे सर्व ताजे अपडेट्स तुम्हाला येथे मिळतील - - कुठे पाहता येईल निकाल? नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तसेच मंडळाच्या या अधिकृत वेबसाइटवर आज, शुक्रवारी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. - निकालाबाबत उत्सुकता दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने १२ मे रोजी घेतला होता. त्यानंतर २८ मे रोजी दहावीचा निकाल मूल्यमापन पद्धतीने लावण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे निकाल कधी लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे शिक्षण विभागाकडून नुकतेच जाहीर करण्यात आले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VSIDbf
via nmkadda
0 टिप्पण्या