Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ७ जुलै, २०२१, जुलै ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-07T16:47:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NATA admit card 2021: अॅडमिट कार्ड जारी Rojgar News

Advertisement
काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरने (CoA) नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ( National Aptitude Test in Architecture, NATA) परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे. काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या अधिकृत संकेतस्थळावर हे अॅडमिट कार्ड उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी दुसऱ्या नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते nata.in या संकेतस्थळावरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. ही परीक्षा रविवारी ११ जुलै २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. जे उमेदवार या परीक्षेत यशस्वी होतील, ते वास्तुकला आणि संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र असतील. उमेदवार मॉक टेस्टसाठी देखील उपस्थित राहू शकतात, मॉक टेस्टची लिंक अधिकृत वेबसाइट वर यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. NATA ही B.Arch (बॅचलर ऑफ आर्किटेक्चर) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा आहे. July 2021 कसे डाऊनलोड कराल अॅडमिट कार्ड स्टेप १ - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट nata.in वर क्लिक करा. स्टेप २ - त्यानंतर ‘registration and result' लिंक वर क्लिक करा. स्टेप ३ - आता विचारलेली माहिती भरा. स्टेप ४ - अॅडमिट कार्ड तुमच्या समोर असेल. स्टेप ५- ते डाऊनलोड करा. स्टेप ६- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउटअवश्य घ्या. NATA चे आयोजन वर्षातून दोन वेळा केले जाते. यापूर्वी परीक्षा १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती आणि त्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे. या परीक्षेचे स्कोरकार्ड उपस्थित झालेल्या वर्षापासून दोन वर्षांसाठी वैध असते. च्या पहिल्या परीक्षेला बसलेले उमेदवार पुन्हा दुसऱ्या परीक्षेला बसू शकतात. परिषदेने NATA 2021 साठी अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष देखील ठरवले आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात किमान ५० टक्के गुण मिळवणे अनिवार्य असते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qZAJrR
via nmkadda