Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T15:47:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET PG 2021: नीट पीजी परीक्षा ११ सप्टेंबरला, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा Rojgar News

Advertisement
PG 2021: नीट पीजी (NEET PG)च्या प्रवेश परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नीट यूजी (NEET UG) प्रवेश परीक्षेची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केल्यानंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी नीट पीजी प्रवेश परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. मेडिकलच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी (Medical PG admission) घेतली जाणारी प्रवेश परीक्षा नीट पीजी (NEET PG)च्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. २०२१ ()चे आयोजन ११ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री (Health Minister) मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांनी परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. विद्यार्थी खूप दिवसांपासून या परीक्षेच्या तारखांची घोषणा होईल याची वाट पाहत होते. करोना प्रादुर्भावामुळे आधी देखील परीक्षा स्थगित करण्यात आली होती. या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून देशातील विविध मेडिकल कॉलेजमध्ये (Medical Colleges in India) एमडी, एमएस आणि पीजी डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश मिळतो. नीट पीजी एक्झाम ()चे आयोजन नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) द्वारे केले जाते. यूजी प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर एक दिवस आधीच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मेडिकल यूजी प्रवेश परीक्षा २०२१ (NEET UG 2021) च्या तारखांची घोषणा केली होती. ही नीट परीक्षा १२ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. यासाठी १३ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. देशभरातील परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन NEET UG 2021 परीक्षा होणार आहे. तसेच परीक्षेसाठी शहरांची संख्या देखील वाढविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याआधीच्या निर्णयानुसार १५५ शहरांमध्ये ही परीक्षा होणार होती. पण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १९८ शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. शहरांसोबत परीक्षा केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. २०२० मध्ये ३८६२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ed9BR3
via nmkadda