TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

शाळेची घंटा वाजू दे! वर्ग सुरू करण्यास ८१ टक्के पालकांची संमती Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाची दुसरी लाट थोडीशी ओसरू लागल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत हालचाली () सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागांत ( ) पहिल्या टप्प्यात आठवी ते १२वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर अन्य वर्ग सुरू करण्याबाबत सुमारे ८१ टक्के पालक उत्सुक असल्याचे समोर आले आहे. राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे कोविडनामुक्त ग्रामीण भागात ग्रामपंचायत समिती आणि स्थानिक प्रशासनाला पालकांसोबत ठराव करून आठवी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. मात्र कोविडमुक्त भागांत अन्य वर्ग सुरू करण्याची मागणी अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग करत आहे. त्याबाबत वारंवार विचारणा होत असल्याने राज्यातील सर्व पालक, शिक्षक, यांच्याकडून शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. हे सर्वेक्षण सोमवारी रात्री १२पर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. यामध्ये सुमारे ८१.१८ टक्के पालकांनी शाळा सुरू व्हायला हव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर १८.८२ टक्के पालकांनी नकार दिला आहे. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना या सर्वेक्षणात मत नोंदवली आहेत. एकूण सहा लाख ९० हजार ८२० जणांनी मते नोंदवली आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४१.५४ टक्के मते ही नववी व १०वीच्या पालकांची आहेत. या विद्यार्थी व पालकांना शाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात, असे वाटत असल्याचे यातून समोर आले आहे. शहरी पालकांचा सर्वाधिक समावेश शाळा सुरू करण्यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक सर्वाधिक सहभागी झाले आहेत. शहरी भागातील शाळांमधील तीन लाख ६३ हजार ६४२ पालकांनी (५२.६४ टक्के) सहभाग नोंदवला आहे. त्याखालोखाल ग्रामीण भागातील दोन लाख ५० हजार ७७९ पालकांनी (३४.८५ टक्के) तर निमशहरी भागातील ८६ हजार ३९९ पालकांनी (१२.५१ टक्के) सहभाग नोंदवला. सर्वाधिक पालक सहभागी झालेले जिल्हे मुंबई - १,१०,१९३ पुणे - ७३,८३८ नाशिक - ४७,२०२ सातारा - ४१,२३३ ठाणे - ३९,२२१ कोल्हापूर - ३०,४३७ पालघर - २३,३३९


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rkRRZv
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या