Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T07:47:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET: देशातील टॉप १० मेडिकल कॉलेजची यादी, जाणून घ्या Rojgar News

Advertisement
Best in India: देशात प्रत्येक वर्षी साधारण १३ ते १५ लाख विद्यार्थी नीट (NEET)परीक्षा देतात. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी UG 2021 प्रवेश परीक्षा १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. नीट २०२१ (NEET 2021) च्या अर्ज प्रक्रियेची (NEET Application) देखील सुरुवात होत असून लाखो विद्यार्थी या प्रक्रियेची वाट पाहत होते. दरम्यान आम्ही तुम्हाला टॉप १० मेडिकल कॉलेजची यादी देणार आहोत. या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा हे प्रत्येक एमबीबीएस (MBBS)आणि एमडी/एमएस विद्यार्थ्याचे स्वप्न असते. ही यादी भारत सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या एनआयआरएफ रॅकिंग २०२० (NIRF Ranking)वर आधारित आहे. नवी दिल्लीचे ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIMS Delhi)हे या यादीमध्ये पहिल्या नंबरवर आहे. नीटमध्ये टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली निवड ही एम्स, नवी दिल्ली हीच असते. एनआयआरएफ रॅंकिंग २०२०मध्ये सर्वाधिक ९०.६९ गुण मिळाले होते. तर चंदीगडचे पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन एंड रिसर्च (PGIMER Chandigarh) कॉलेज हे या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. याला १०० पैकी ८०.०६ गुण मिळाले होते. तामिळनाडूच्या वेल्लोरमधील क्रिश्चियन (CMC Vellore)देशातील टॉप मेडिकल कॉलेजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. एनआयआरएफ रँकिंग २०२० मध्ये याला ७३.५६ गुण मिळाले होते. तर बंगळुरुच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्यूरो सायन्सेस (NIMHANS) ७१.३५ गुणांसहित चौथ्या नंबरवर आहे. इथे केवळ पीजी कोर्सचे प्रवेश होतात. उत्तर प्रदेश लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGIMS) पाचव्या स्थानी आहे. याचा NIRF स्कोअर ७०.२१ आहे. इथे केवळ पीजी कोर्समध्ये प्रवेश घेतले जातात. तर वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठ (BHU)शिक्षणाच्या बाबतीत उत्तम शिक्षणासाठी ओळखले जाते. हे NIRF Ranking मध्ये बीएचयू स्कोअर ६४.७२ सहित सहाव्या नंबरवर आहे. अमृता इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च (AIMSR)सातव्या स्थानी आहे. ही संस्था केरळच्या कोची शहरामध्ये आहे. जवाहरलाल इंस्टीट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER)एकूण मेडिकल एज्युकेशनच्या यादीत आठव्या स्थानी आहे. पण एमबीबीएस विद्यार्थ्यांमध्ये या कॉलेजला अधिक पसंती आहे. पॉंडेचरीमधील या संस्थेत प्रवेशासाठी विद्यार्थी धावपळ करत असतात. कर्नाटकच्या मणिपालमध्ये कस्तूरबा मेडिकल कॉलेज म्हणजे केएमसी (KMC) टॉप कॉलेजच्या यादीत एनआयआरएफ रॅंकिंग २०२० नुसार नवव्या स्थानी आहे. याचा स्कोर ६२.८४ होता. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी(KGMU) मेडिकल कॉलेजच्या क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. हे लिस्टमध्ये ६२.२० स्कोरसहित दहाव्या नंबरवर आहे. पण एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी इथे प्रवेश मिळणे म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e8ztNS
via nmkadda