Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २३ जुलै, २०२१, जुलै २३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-23T12:43:30Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET सहित इतर प्रवेश परीक्षा स्थगित होणार? केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली माहिती Rojgar News

Advertisement
Central Government informed about and other Entrance Exam : देशातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर NEET सहित अन्य देखील रद्द होणार का? असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. दरम्यान NEET सहित इतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री आणि परिवार कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार (Union Minister of State for Health and Family Welfare, Dr. Bharati Pravin Pawar) यांनी दिली. लोकसभेमध्ये एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. यूजी आणि पीजी दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या मेडिकल एन्ट्रन्स एक्झाम या क्रमश: १२ आणि ११ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. परीक्षेमध्ये करोना प्रतिबंध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. याव्यतिरिक्त विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. परीक्षा केंद्रांवर गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. परीक्षा केंद्राच्या प्रवेश द्वारावर विद्यार्थ्यांचे तापमान तपासले जाणार आहे. सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमान असलेल्या उमेदवारांना एका वेगळ्या आयसोलेशन लॅबमध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री आणि परिवार कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WeoFI0
via nmkadda