TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

NEET UG 2021 अखेर लांबणीवर; आता सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा Rojgar News

NEET UG 2021: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी प्रवेश परीक्षा १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने(NTA) हा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर NEET UG 2021 ही परीक्षा १२ सप्टेंबरला होणार आहे. १३ जुलैपासून एनटीएच्या वेबसाइटवर अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीटरवरुन दिली. देशभरातील परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन NEET UG 2021 परीक्षा होणार आहे. तसेच परीक्षेसाठी शहरांची संख्या देखील वाढविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याआधीच्या निर्णयानुसार १५५ शहरांमध्ये ही परीक्षा होणार होती. पण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १९८ शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. शहरांसोबत परीक्षा केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. २०२० मध्ये ३८६२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. मागील वर्षी कोविड -१९ महामारी आणि लॉकडाऊनमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. अनेकदा लांबणीवर पडल्यानंतर अखेर सप्टेंबर २०२० मध्ये परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. यंदा NEET-UG 2021 परीक्षा १ ऑगस्ट २०२१ रोजी होणार असे म्हटले जात होते. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in वर यासंदर्भातील माहिती मिळू शकणार आहे. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर मास्क देण्यात येणार आहे. परीक्षार्थींची नोंदणी, एन्ट्री आणि एक्झिट यावेळी जवळून संपर्क होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. सॅनिटायझेशन, बसण्याच्या व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2T3abJE
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या