Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १२ जुलै, २०२१, जुलै १२, २०२१ WIB
Last Updated 2021-07-12T14:47:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
TY B.Sc IT SEM VI Result: मुंबई विद्यापीठातर्फे TY B.Sc IT SEM VI (CBCS)च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विद्यापीठातर्फे या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मे २०२१ मध्ये ही घेण्यात आली होती. यंदा या परीक्षेचा निकाल ९६.५४ टक्के लागला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2eryysJ वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन विद्यार्थी निकाल पाहू शकतात. मुंबई विद्यापीठाअंतर्गत एकूण ९,६२७ विद्यार्थ्यांनी उन्हाळी सत्राच्या विज्ञान शाखेच्या सत्र ६ परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ९,६११ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले. १६ विद्यार्थी गैरहजर होते. यातील एकूण ७००२ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. तर २५१ विद्यार्थी नापास झाले. विद्यार्थ्यांची पास होण्याची सरासरी एकूण ९६.५४ टक्के इतकी आहे. विद्यापीठाने आतापर्यंत उन्हाळी सत्राचे ४१ निकाल जाहीर केले आहेत. मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. इतर पदवी परीक्षेच्या अंतिम सत्राचे निकाल देखील अंतिम टप्प्यात असून तेही निकाल लवकरच जाहीर केले जातील असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AWSjBe
via nmkadda