Advertisement

in : TCS ही देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यात कंपनी असून लाखो तरुणांच्या मनात इथे करण्याची इच्छा असते. यातील अनेकांची इच्छा आता पूर्ण होऊ शकते.TCSमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टीसीएसमध्ये ४० हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. TCS तर्फे ही माहिती देण्यात आली आहे. २०२१-२२ या वर्षात ४० हजार फ्रेशर्सना नोकरी देणार असल्याचे TCS चे एचआर प्रमुख मिलिंद लक्कड यांनी सांगितले. ५ लाखांहून अधिक कर्मचारी संख्या असलेली खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी TCS ने गेल्यावर्षी ४० हजार फ्रेशर्सची भरती केली होती. यावेळेस ही संख्या वाढलेली असेल असेही ते म्हणाले. करोना प्रादुर्भावाच्या काळात जगभरात निर्बंध लागले असताना देखील नोकर भरतीमध्ये काही अडचण आली नाही. गेल्यावर्षी एकूण ३.६० लाख फ्रेशर्स एका ऑनलाइन प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून सहभागी झाल्याचे लक्कड म्हणाले. भारतातील कॅम्पसमध्ये आम्ही गेल्यावर्षी ४० हजार जणांची भरती केली. आम्ही यावर्षी देखील ४० हजार किंवा त्याहून अधिक नोकर भरती करु असेही ते म्हणाले. यावर्षी नोकर भरती अधिक वेगाने असेल. याच पद्धतीने कंपनीने गेल्यावर्षी अमेरिका कॅम्पसमध्ये २ हजार प्रशिक्षणार्थींची भरती केली होती. यावर्षीच्या फ्रेशर्स भरतीची नेमकी आकडेवारी त्यांनी सांगितली नाही. भारतात प्रतिभेची कमतरता नसून इथे प्रतिभावंत कामगार असल्याचे टीसीएसचे मुख्य विभाग अधिकारी एन गणपति सुब्रम्हण्यम यांनी म्हटले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3khAJ50
via nmkadda