TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

भारत सरकारच्या संसद टेलिव्हिजनमध्ये नोकरीची संधी Rojgar News

Sansad Television Recruitment: भारत सरकारच्या संसद टेलिव्हिजनमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. २९ जुलै ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. भारत सरकारच्या (प्रशासन आणि वित्त) यांच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी शैक्षणिक आर्हता आणि पगार हा वेगळा असणार आहे. विविध पदांच्या एकूण ३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याचे पात्रता, निकष जाहिरातीमध्ये सविस्तर देण्यात आले आहेत. उमेदवारांनीऑनलाईन पद्धतीने दिलेल्या ईमेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. या पदांची भरती संसद टेलिव्हिजनमध्ये एचआर मॅनेजर, डिजिटल हेड, वरिष्ठ निर्माता, अँकर/ निर्माता, निर्माता, सहाय्यक निर्माता, ग्राफिक्स, प्रोमो संपादक, वरिष्ठ व्हिडिओ संपादक, कनिष्ठ व्हिडिओ संपादक, स्विचर, सिनिअर सोशल मीडिया कंटेट रायटर, सोशल मीडिया हँडल्स मॅनेजर आणि वेबसाइट व्यवस्थापक पदांच्या जागा रिक्त आहेत. शेवटची तारीख या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी २९ जुलै २०२१ पर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी sansadtvadvt@gmail.com हा ईमेल आयडी देण्यात आला आहे. केवळ भारतीय नागरिकत्व असलेल्यांना ही नोकरी मिळू शकते.उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज भरणे आवश्यक आहे. भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. २९ जुलैनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जामध्ये खोटी माहिती आढळल्यास उमेदवाराला तात्काळ निलंबित करण्यात येईल. उमेदवाराचा परफॉर्मन्स समाधानकारक नसेल तर नोटीस न देता काढले जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U2iy8T
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या