
यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ()अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने सोमवार १२ जुलै पासून परीक्षा केंद्रात बदल करण्यासाठी एग्जाम सेंटर चेंज विंडो उघडली आहे. ज्या उमेदवारांनी १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत आणि त्यांना परीक्षा केंद्रात बदल करायचा असेल तर ते यासाठी अर्ज करू शकतात. UPSC ने अल्मोडा, श्रीनगर, नाशिक आणि सूरत मध्ये चार परीक्षा केंद्रे नव्याने समाविष्ट केली आहेत. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस प्रिलिमनरी एक्झामिनेशन म्हणजेच भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा देखील याच केंद्रांवर आयोजित करण्यात येईल. UPSC ने सांगितले, 'परीक्षा केंद्रांची विंडो दो टप्प्यांत उघडली जाणार आहे. पहिला टप्पा १२ जुलै ते १९ जुलै २०२१ या कालावधीत (सायंकाळी ६ वाजता) आणि दुसरा टप्पा २६ जुलै ते ३० जुलै 26 जुलाई से 30 (सायंकाळी ६ वाजता) पर्यंत आहे. उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर अर्ज करू शकतात.' UPSC प्रीलिम्स परीक्षा आधी जून २०२१ मध्ये आयोजित केली जाणार होती, पण करोना महामारीच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेता आयोगाने परीक्षा केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीएससीने आपल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AXFJlA
via nmkadda
0 टिप्पण्या