TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

शिक्षणासाठी काहीपण! ऊंटावरुन प्रवास करुन विद्यार्थ्यांच्या शिकवणीस जातात शिक्षक Rojgar News

travels by to teach students: करोना काळामध्ये देशासह जगाभरात सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला. व्यवस्थेला आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचे देखील यामुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहता त्यांच्या शाळेत येण्यावर बंदी घालण्यात आली. ऑफलाइन शिक्षण बंद ठेवून ऑनलाइन वर्ग सुरु झाले आहेत. पण अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाहीत. बऱ्याच क्षेत्रांमध्ये इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अडचणी येत आहेत. पण काही शिक्षकांनी या परिस्थितीवर मात केली आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये शिक्षकांनी स्वत:चा आदर्श जगासमोर ठेवला आहे. कठीण प्रसंगाला कसे सामोरे जाव? याचे उदाहरण या शिक्षकांनी आखून दिले आहे. बाडमेरमध्ये शिक्षक ऊंटावर बसून विद्यार्थ्यांच्या घरी शिकवायला जातात. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल आणि इंटरनेट सुविधेचा अभाव आहे, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षक पोहोचले आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या शिक्षकांनी ऊंटांची मदत घेतली आहे. सरकारी शाळांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली जात आहे. यासंदर्भात भीमथल या सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रुप सिंह झाकड यांनी या शिक्षकांचे कौतुक केले आहे. 'हे शिक्षक कौतुकास पात्र आहेत. असे प्रयोग सातत्याने होत राहायला पाहिजेत. बाडमेरमध्ये विद्यार्थ्यांकडे संसाधनांची कमी आहे. पण राज्य सरकारच्या निर्देशानंतर आम्ही लोकांसोबत राहून अनेक वेगळे प्रयोग करत आहोत' असे ते म्हणाले. हे काम दिसतं तितकं सोपंही नाहीय. दूरवर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये देखील प्रत्येक पावलाववर अडचणी येत असतात. सुरुवातील शिक्षकांना काही अडचणी आल्या पण त्यांनी यावर मात केल्याचेही ते म्हणाले. राजस्थान शिक्षण विभागाचे अधिकारी सौरव स्वामी यांनी म्हटले की, साधारण ७५ लाख विद्यार्थ्यांपैकी अनेक जणांकडे मोबाईल नाहीय. तसेच बाडमेरमध्ये विद्यार्थ्यांकडे संसाधनांची कमी आहे. हे पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दोनवेळा घरी जाऊन शिकवावे असे ठरले. आपण कठीण काळातून जात आहोत. या काळात आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत. त्यामुळे शिक्षकांना देखील कमीत कमी अडचणी याव्यात यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hzc7mQ
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या