Advertisement

म. टा. प्रतिनिधी मुंबई : क्रीडापटूंना प्राप्तिकर खात्यात नोकरीची संधी आहे. प्राप्तिकर निरीक्षक, कर सहाय्यक या पदांसाठी मुंबईच्या प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्तांनी जाहिरात काढली आहे. चर्चगेट येथे मुख्यालय असलेल्या प्राप्तिकर आयुक्तालयाने विशिष्ट क्रीडा, खेळ यामध्ये नैपुण्य मिळवलेल्यांसाठी खात्यात नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत आठ प्राप्तिकर निरीक्षक, ८३ कर सहाय्यक व ६४ बहुकौशल्य कार्यातील कर्मचारी यांचा त्यात समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख २५ ऑगस्ट आहे. इच्छुक उमेदवार मुंबई प्राप्तिकर विभागाच्या https://ift.tt/3hpug6e किंवा https://ift.tt/3ywBKu0 या वेबसाइटला भेट देऊन माहिती घेऊ शकतात. विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्राप्तिकर निरीक्षक पदासाठी १८ ते ३०, कर सहाय्यक पदासाठी १८ ते २५ तर बहुकौशल्य कार्यातील कर्मचाऱ्यांसाठी १८ ते २५ वर्षे वयाची अटक आहे. ओबीसी उमेदवारांसाठी वयमर्यादेत पाच वर्षे तर अनुसूचित जाती किंवा जमातीतील उमेदवारांसाठी वयमर्यादेत दहा वर्षांची शिथिलता असेल. याखेरीज सध्या प्राप्तिकर विभागात कार्यरत असलेल्यांसाठी केंद्र सरकारी सेवेचा किमान तीन वर्षे अनुभव व ४० वर्षे वय अत्यावश्यक आहे. अनुसूचित जाती किंवा जमातीतील उमेदवारांसाठी ही अट ४५ वर्षे असेल. प्राप्तिकर निरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी, कर सहाय्यक पदासाठी ताशी ८ हजार शब्द टाइप करण्याची क्षमता व बहुकौशल्य कर्मचाऱ्यांसाठी दहावी उत्तीर्ण अत्यावश्यक आहे. या सर्व पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच सर्व उमेदवार हे भारतीय नागरिक असणे अत्यावश्यक आहे. यांना संधी... विशिष्ट क्रीडा, खेळ यामध्ये नैपुण्य अशी आहेत पदे आठ प्राप्तिकर निरीक्षक, ८३ कर सहाय्यक, ६४ बहुकौशल्य कर्मचारी वयाची अट निरीक्षक पदासाठी १८ ते ३०, कर सहाय्यक पदासाठी १८ ते २५, बहुकौशल्य कर्मचाऱ्यांसाठी १८ ते २५ पद वेतन प्राप्तिकर निरीक्षक ४४,९०० - १,४२,४०० (सातवा वेतन स्तर) कर सहाय्यक २५,५०० - ८१,१०० (चौथा वेतन स्तर) बहुकौशल्य १८,००० - ५६,९०० (पहिला वेतन स्तर)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hSmp0h
via nmkadda