Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ८ जुलै, २०२१, जुलै ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-08T07:47:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

औरंगाबादमध्ये शिक्षकांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या घरी भरतेय शाळा Rojgar News

Advertisement
Offline Education: करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन शिक्षण बंद आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे घरुन ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. दरम्यान ऑनलाइन शिक्षणात काही अडथळा येऊ नये म्हणून औरंगाबादमधील शिक्षक विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिक्षण देत आहेत. राज्यातील ७२ शाळांतील साधारण २०० शिक्षक विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवत आहेत. औरंगाबाद शिक्षण विभागाच्या उर्दू आणि मराठी माध्यमातील शिक्षकांनी हा पुढाकार घेतलाय. करोना संक्रमण रोखण्यासाठी राज्यातील शाळा सध्या बंद आहेत. पण अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन वर्गासाठी मोबाइल किंवा इंटरनेटचे साधन नाहीय. यामुळे विद्यार्थ्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागत आहे. त्यामुळे औरंगाबाद शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिक्षण देण्याची योजना आखली. गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावादरम्यान आम्ही विद्यार्थ्यांसाठी कार्यपुस्तिका छापली आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यावर्षी ही कल्पना शहरातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात आल्याचे गरखेडा उर्दू शाळेची शिक्षिका हुमेरा अंजूमने सांगितले. मी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना एक दिवस आड करुन शिकवायला जाते. आम्ही कुठेही बसतो. कोणत्याही ठिकाणी मुलांना शिकवतो. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकडे मी लक्ष देत असल्याचे ती म्हणाली. आमच्या शाळेत कोणत्याही विद्यार्थ्याने शिक्षण सोडले नाही. कारण आम्ही सर्वांच्या संपर्कात आहोत. आता आम्हाला अभ्यासक्रमाची कोणती काळजी नाही. पण मुलांनी शिकावं आणि आपला गृहपाठ पूर्ण करावा याकडे आम्ही लक्ष देतो असेही ती म्हणाली. घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवल्याने त्यांच्या आईवडिलांना देखील शिक्षणात स्वारस्य वाढत असल्याचे औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी शाळेतील शिक्षक संजीव सोनार यांनी सांगितले. साधारण ७५ टक्के विद्यार्थ्यांकडे स्वत:चा मोबाइल नाहीय. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण शक्य नाहीय. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही त्यांच्या घरी जाऊन शिकवत आहोत असे सोनार म्हणाले. सध्या ७२ शाळांमधील साधारण २०० शिक्षक विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिक्षण देत असल्याचे नगर निगम शिक्षण अधिकारी रामनाथ थोर यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ed9vJl
via nmkadda