Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २ जुलै, २०२१, जुलै ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-07-02T12:47:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबईतल्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये भरती, शेवटची तारीख जाणून घ्या Rojgar News

Advertisement
at : देशातील प्रतिष्ठित संस्थामध्ये गणल्या जाणाऱ्या मुंबईतील टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये आहे. यासाठी संस्थेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा यामाध्यमातून भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवरांनी ई-मेलच्या माध्यमातून भरतीसाठी अर्ज करायचा आहे. टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये विविध पदांच्या एकूण १५ जागा आहेत. कार्यक्रम सहाय्यक, सामग्री तयार करणारे, कार्यक्रम अधिकारी, संशोधन सहाय्यक, सल्लागार, खाते आणि वित्त पदांच्या जागा रिक्त आहेत. यासाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगळी असेल. या माहितीसाठी बातमीखाली नोटिफिशनची लिंक देण्यात आली आहे. प्रोग्राम असिस्टंट पदाच्या २ जागा या ६ महिन्यांच्या कालावधीसाठी तर २ जागा या १ वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहेत. यासाठी पगार २५ हजार दरमहा असणार आहे. कंटेट क्रिएटर ही पोस्ट ६ महिन्यांसाठी असून ३० हजार इतका पगार देण्यात येणार आहे. प्रोग्राम ऑफिसर हे पद १२ महिन्याच्या कालावधीसाठी भरले जाणार असून यासाठी ३५ हजार इतका पगार आहे. १२ महिन्यांसाठी संशोधक सहाय्यक पदाच्या २ जागा भरल्या जातील. यासाठी ३० हजार पगार दिला जाणार आहे. पार्ट टाईम काऊंन्सिलर पदाच्या ६ जागा रिक्त असून ११ महिन्यांसाठी याची मुदत असणार आहे. या पदासाठी १५ हजार पगार दिला जाणार आहे. अकाऊंट आणि फायनान्स हे पद ११ महिन्यांसाठी भरले जाणार असून यासाठी १० हजार पगार दिला जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज हा icallhelpline@gmail.com या ईमेलवर पाठवायचा आहे. ५ जुलै २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3huDgWx
via nmkadda