Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १७ जुलै, २०२१, जुलै १७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-17T05:47:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दहावी रिझल्टनंतर आयटीआयमध्ये प्रवेश घ्यायचाय? असा करा अर्ज Rojgar News

Advertisement
ITI Admmission 2021: यावर्षी दहावीच्या निकालात एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होणार आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश () घ्यायचाय त्यांच्यासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आयटीआय प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा न घेता संबंधीत मंडळांनी निर्गमित केलेल्या दहावीच्या गुणपत्रिकेतील गुण आणि प्रवेश नियमावलीनुसार निर्धारित गुणाधिक्य याआधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संचालनालयाची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2BH1dcn या संकेतस्थळावर प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. माहिती पुस्तिका वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे. प्रवेश अर्ज भरताना आधी मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे. एका मोबाइल नंबरवर एकच प्रवेश दिला जाईल. आयटीआय संस्थेत प्रवेश अर्ज भरतांना उमेदवारांनी त्यांचा इयत्ता दहावी परिक्षेचा बैठक क्रमांक (Seat Number) नमुद केल्यास त्यांची वैयक्तिक व इयत्ता दहावीच्या परिक्षेतील गुण याबाबत सर्व माहिती प्रवेश अर्जात आपोआप नमुद होईल (Auto Populate). ऑनलाइन अर्जामध्ये प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते (Admission Account), त्याचा नोंदणी क्रमांक हाच युजर आयडी म्हणून तयार होईल. उमेदवाराने त्याच्या अकाऊंटवर लॉगिन करुन Admission Activity च्या अंतर्गत येणाऱ्या Application link वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज भरावा. भरलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करुन घ्यावी. याची खात्री पटल्यानंतर अर्ज शुल्क ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून भरावे. अर्ज शुल्क भरल्यानंतरच प्रवेश निश्चित होईल. राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये, अराखीव प्रवर्गासाठी १५० रुपये, राज्याबाहेरील उमेदवारासाठी ३०० रुपये आणि अनिवासी भारतीय उमेदवारासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. अर्ज शुल्क भरल्यानंतर वेबसाइटवर लॉगिन करुन पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय आणि संस्थानिहाय माहीती भरता येणार आहे. उमेदवाराने एकच अर्ज करावा. अन्यथा अर्ज रद्द करण्यात येईल. उमेदवारांना प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश अर्ज शुल्क भरणे व प्रवेश अर्ज निश्चितीसाठी कोणत्याही आयटीआय संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. दहावीची गुणपत्रिका शाळांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात आल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. समकक्षता मिळणार दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येणार आहे. आयटीआय संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3koQCHb
via nmkadda