Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ५ जुलै, २०२१, जुलै ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-05T09:47:07Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

देशात पहिल्यांदाच महिला शिक्षकांची संख्या पुरुष शिक्षकांपेक्षा अधिक- रिपोर्ट Rojgar News

Advertisement
Number of Incresed: वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे आपण पाहतो. आता शिक्षण क्षेत्रातून देखील अशीच आनंदाची बातमी आली आहे. देशात पहिल्यांदाच महिला शिक्षकांची संख्या ही पुरुष शिक्षकांपेक्षा अधिक असलेली दिसून आली. देशातील शाळांमध्ये पुरुष शिक्षकांच्या तुलनेत महिला शिक्षकांची संख्या जास्त असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑन स्कूल एज्युकेशन (यू-डीआयएसई) २०१९-२०२० ने यासंदर्भात जाहीर केला आहे. त्यानुसार भारतातील महिला शिक्षकांनी आपल्या पुरुष शिक्षकांना मागे टाकले आहे. देशाच्या ९६.८ लाख शिक्षकांपैकी ४९.२ लाख महिला आहेत. U-DISE रिपोर्ट केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे जाहीर केला जातो. २०२१ नंतर महिला शिक्षकांच्या संख्येत वाढ वर्ष २०१२-१३मध्ये ४२.४ लाख पुरुषांच्या तुलनेत देशभरात ३५.८ लाख महिला शिक्षिका होत्या. या दरम्यान शाळांमध्ये सात वर्षांमध्ये ३७ टक्के महिला शिक्षकांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली आहे. या कालावधीत पुरुष शिक्षकांची संख्या ४२.४ लाखने वाढून ४७.७ लाख झाली आहे. महिला शिक्षिका केवळ प्रायमरी लेव्हलमध्ये टॉपवर आहे. रिपोर्टनुसार हायर प्रायमरीनंतर वर्गामध्ये पुरुष शिक्षकांची संख्या अधिक आहे. प्री प्रायमरी लेवलवर २७ हजार पुरुषांवर १ लाखहून अधिक आहेत. १९.६ लाख महिला आणि १५.७ लाख पुरुष शिक्षकांसहित प्रायमरी ग्रेडमधील रेशिओ जास्त बॅलेंस्ड आहे. हायर प्रायमरी क्लासेसमध्ये ११.५ लाख पुरुष आणि १०.६ लाख महिला शिक्षक आहेत. यापुढील इयत्तांमध्ये महिला आणि पुरुष शिक्षकांच्या संख्येतील अंतर वाढत जाते. सेकेंडरी शाळांमध्ये ६.३ लाख पुरुष आणि ५.२ लाख महिला शिक्षक आहेत. तर हायर सेकेंडरीमध्ये ३.७ लाख असून २.८ लाख महिला शिक्षक आहेत. इथे पुरुष शिक्षकांची संख्या जास्त सरकारी आणि अनुदानितत शाळांमध्ये पुरुष शिक्षकांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले. विनाअनुदानित खासगी विद्यालयांमध्ये महिला शिक्षक पुढे आहेत. मोठ्या राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, मेघालय, पंजाब आणि तामिळनाडूचा अपवाद वगळता हायर ग्रेडमध्ये महिलांपेक्षा अधिक संख्या पुरुष शिक्षकांची आहे. या राज्यांमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांमध्ये पुरुष शिक्षकांच्या तुलनेत महिला शिक्षकांची संख्या जास्त आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3huocbC
via nmkadda