Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १५ जुलै, २०२१, जुलै १५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-15T12:47:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

कल्याणची पताका फडकणार अंतराळातही! संजल गावंडे या तरुणीची मोठी झेप Rojgar News

Advertisement
म. टा. वृत्तसेवा, कल्याण अमेरिकास्थित 'ब्ल्यू ओरिजिन' या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची घोषणा केली आहे. येत्या २० जुलैला या कंपनीतर्फे 'न्यू शेफर्ड' हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अॅमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या पथकामध्ये कल्याणच्या संजल गावंडे या तरुणीचा समावेश आहे. इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध परीक्षा देत संजलने या उंचीवर झेप घेतली आहे. कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या संजलची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलमधील, तर वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संजलने दहावीपर्यंतचे शिक्षण मॉडेल हायस्कूलमध्ये, बारावीपर्यंतचे शिक्षण बिर्ला कॉलेज आणि त्यापुढील पदवीपर्यंतचे शिक्षण वाशीच्या फादर अॅग्नेल महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले. त्याच जोडीला जीआरई, टोफेलसारख्या इंजिनीअरिंग विषयातील कठीण परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाच्या जोरावर तिने अमेरिकेतील मिशिगन टेक युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवत पुढील शिक्षण सुरू केले. तिथेही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन संजलने मेकॅनिकलमध्ये मास्टर पदवी प्राप्त केली. या पदवीनंतर तिने २०१३ मध्ये विस्कॉनसिनमधील फॉन्ड्युलेकच्या मर्क्युरी मरीन या नामंकित कंपनीत काम सुरू केले. मनासारखी नोकरी मिळाल्यानंतरही तिचे मन आणि लक्ष सतत अवकाशाकडे लागले होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने नोकरी करता-करता शनिवार-रविवारच्या सुट्टीमध्ये विमान चालवण्याचे प्रशिक्षण सुरू केले. १८ जून २०१६ रोजी तिला वैमानिक म्हणून परवाना मिळाला आणि तिच्या स्वप्नांच्या पंखांना खऱ्या अर्थाने बळ प्राप्त झाले. कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज सिटीमध्ये टोयाटो रेसिंग डेव्हलपमेंट या नामांकित कंपनीत मेकॅनिकल डिझाइन इंजिनीअर म्हणून तिच्या कामाला सुरुवात झाली. रेसिंग गाड्यांचे इंजिन डिझाइन करण्याचे काम ती करत होती. यादरम्यान तिने नासामध्ये अर्ज केला होता. नासासाठी मुलाखत दिल्यानंतर नागरिकत्वाच्या मुद्द्यावर तिची निवड होऊ शकली नाही. मात्र त्यामुळे निराश न होता संजलने नासासाठी काम करणाऱ्या ब्ल्यू ओरिजिनमध्ये अर्ज केला आणि विशेष म्हणजे त्याठिकाणी तिची निवडही झाली. आता 'न्यू शेफर्ड' या अंतराळयानाचे आरेखन करणाऱ्या दहा जणांच्या पथकामध्ये संजलचा समावेश झाला असल्याने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36E7z8s
via nmkadda