Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २१ जुलै, २०२१, जुलै २१, २०२१ WIB
Last Updated 2021-07-21T05:45:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अकरावी सीईटीला एक महिना शिल्लक; कसा कराल अभ्यास? Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा () २१ ऑगस्टला होणार आहे. ही परीक्षा कशी असेल, त्यासाठीचा अभ्यासक्रम काय () असेल, यावर राज्य माध्यमिक मंडळाकडून सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली आहे. पहिल्यांदाच ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्यावर काही प्रमाणात दडपण आले असून ते कमी करण्यासाठी या परीक्षेची सविस्तर माहिती पोहोचवण्याचा हा प्रयत्न. अशी होणार परीक्षा () अकरावी प्रवेशांसाठी आवश्यक सीईटी २१ ऑगस्टला सकाळी ११ ते १ या वेळेत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी विद्यार्थी राहत असलेल्या परिसराजवळची केंद्र देण्यात येणार असून त्या केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा एकूण १०० गुणांची होणार असून इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्रे या चार विषयांवर आधारित १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी राज्य माध्यमिक मंडळाकडून अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. अभ्यासक्रम विषय प्रकरणे गणित (भाग १) - दोन चलांतील रेषीय समीकरणे, वर्गसमीकरणे, अंकगणित श्रेढी, संभाव्यता गणित (भाग २) - समरूपता, पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, निर्देशक भूमिती, त्रिकोणामिती विज्ञान (भाग १) - गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युतधारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्याचे उपयोग, धातू विज्ञान, कार्बनी संयुगे, अवकाश मोहिमा विज्ञान (भाग २) - अनुवांशिकता व उत्क्रांती, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग १ व २, पर्यावरणीय व्यवस्थापन, हरित ऊर्जेच्या दिशेने, प्राण्यांचे वर्गीकरण, सूक्ष्मजीवशास्त्रांची ओळख, पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान, सामाजिक आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन समाजशास्त्रे (भाग १) - प्राचीन ते अधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकीत्सक समालोचन, उपयोजित इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजन माध्यमे आणि इतिहास, कला क्षेत्र आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, इतिहास व अन्य क्षेत्र, संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक राजकीय चळवळी, समाजशास्त्रे -भूगोल (भाग २) - स्थान व विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, अर्थव्यवस्था व व्यवसाय, पर्यटन वाहतूक व संदेशवहन इंग्रजी - भाषा अभ्यास (व्याकरणाचा सर्व भाग), इंग्रजी उताऱ्याचे आकलन (पॅसेज कॉम्प्रिहेन्शन), इंग्रजी कविता, लेखन कौशल्ये परीक्षेसाठी आठ माध्यमे सात वेगवेगळ्या माध्यमांतून देता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना संबंधित माध्यम निवडणे बंधनकारक असणार आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू, उर्दू, कन्नड, सिंधी, अशा भाषांचे पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येतील. या भाषांची प्रश्नावली विद्यार्थ्यांना देण्यात येईल. जर विद्यार्थ्यांनी सेमी इंग्रजी माध्यम निवडले तर इंग्रजी, विज्ञान आणि गणिताचे प्रश्न इंग्रजीत असतील तर समाजशास्त्रांचे प्रश्न हे विद्यार्थ्यांने निवडलेल्या भाषेत विचारले जातील. परीक्षेसाठी असा करा अर्ज परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना http://cet.mh-ssc.ac.in या लिंकवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. जर विद्यार्थी राज्य माध्यमिक मंडळाचे असतील तर लिंक ओपन केल्यानंतर विद्यार्थ्यांना केवळ त्यांचा दहावीचा बैठक क्रमांक आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे. उर्वरित सर्व माहिती आपोआप भरली जाईल. याशिवाय विद्यार्थ्यांना ज्या माध्यमातून परीक्षा द्यायची आहे त्याची निवड करणे बंधनकारक असून विद्यार्थ्यांनी आपल्या राहत्या घराच्या जवळचा भाग निवडणेदेखील गरजेचे असणार आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना जवळची परीक्षा केंद्र दिली जातील. इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक मंडळाच्या व्यतिरिक्त इतर मंडळातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज भरताना संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना माध्यमाची निवड करणे, मोबाइल क्रमांक देणे, फोटो आयडी, किंवा स्वत:चा फोटो अपलोड करणे, आणि ऑनलाइन पद्धतीने १७८ रुपयांचे शुल्क भरणे बंधनकारक असणार आहे. इतर सर्व प्रक्रिया राज्य माध्यमिक मंडळाच्या विद्यार्थ्यांसारखीच करावी लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Bz55GL
via nmkadda