TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

महाराष्ट्र वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत भरती, १२ ऑगस्टपर्यंत करा अर्ज Rojgar News

Ministry of Commerce and Industry : महाराष्ट्र वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत अनेक पदांची भरती निघाली आहे. याअंतर्गत सुरक्षारक्षक पदांच्या एकूण २० जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत विकास आयुक्त, एसईपीझेड विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक विकास अधिकारी पदांच्या रिक्त जांगासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांना दिलेल्या नमुन्यानुसार फॉर्म भरावा लागणार आहे. याअंतर्गत सहायक विकास अधिकारी पदांच्या २० जागा भरल्या जातील. यात मुंबईतील ७ आणि पुण्यातून १३ पद भरण्यात येणार आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. यासाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता देखील बदलणार असल्याची नोंद अर्जदारांनी घ्यावी. मूळ जाहिरातीमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बातमीखाली लिंकवर क्लिक करुन उमेदवार मूळ जाहिरात पाहू शकतात. ही नियुक्ती ३ वर्षांसाठी असणार आहे. डिओपीटीच्या निर्देशानंतर योग्यतेच्या आधारे गरजेनुसार हा कालवधी पुढे वाढवला जाऊ शकतो. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत उमेदवाराने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांना १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवावा लागेल. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच अर्ज पाठविण्यापूर्वी उमेदवारांनी तो काळजीपूर्वक वाचून घ्यावा. यामध्ये कोणता गोंधळ आढळल्यास अर्ज बाद करण्यात येणार आहे. डेव्हलपमेंट कमिशनर सीप्झ सर्व्हिस कार्यालय, सेंटर बिल्डींग अंधेरी.मुंबई- ४०००९६ या पत्त्यावर अर्ज पाठवावे लागणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qRkexQ
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या