Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T06:47:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

करोना काळातही सर्व सेक्टर्समध्ये नोकर भरती वाढली-रिपोर्ट Rojgar News

Advertisement
increase in in all : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर जून महिन्यात सर्व सेक्टर्समध्ये मे २०२१च्या तुलनेत नोकर भरती वाढलेली दिसली. गेल्या सहा महिन्यामध्ये सर्व सेक्टर्समधील नोकर भरतीमध्ये ६ टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंटने यासंदर्भातील अहवाल जाहीर केला आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट रिपोर्टनुसार, करोना प्रादुर्भावाची लाट आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतरही गेल्या सहा महिन्यात सर्व सेक्टर्समधील नोकर भरतीत ६ टक्केंनी वाढ पाहायला मिळाली. मे २०२१ ते जून २०२१ पर्यंत नोकर भरतीमध्ये दरमहा ४ टक्के वाढ पाहायला मिळाली. जून २०२० ते जून २०२१ पर्यंत नोकर भरतीतील वार्षिक ग्रोथ ७ टक्के आहे. देशभरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर जून २०२१ मध्ये मे २०२१ च्या तुलनेत नोकर भरतीमध्ये सुधार पाहायला मिळाला. टेलीकॉम इंडस्ट्रीची वार्षिक वाढ ३९ टक्के आहे. बंगळुरच्या नोकर भरतीमध्ये ५० टक्केहून वाढ पाहायला मिळाली. त्याखाली पुण्यामध्ये २९ टक्के वाढ पाहायला मिळाली. हैदराबाद आणि चेन्नईमध्ये स्वतंत्ररित्या २२ टक्के नोकर भरती झाल्याची नोंद रिपोर्टमध्ये आहे. करोनामुळे ट्रॅव्हल आणि टूरिझम इंडस्ट्रीचे नुकसान ट्रॅव्हल आणि टूरिझम इंडस्ट्रीमध्ये जून २०२० ते जून २०२१ पर्यंत करोना प्रादुर्भावामुळे निगेटीव्ह ईयरली ग्रोथ नोंदवली गेली. या इंडस्ट्रीमधील ग्राफ ४२ टक्क्यांनी खाली आला आहे. करोना प्रादुर्भावाचा सर्वात जास्त परीणाम ट्रॅव्हल आणि टुरिझम इंडस्ट्रीवर झाला आहे. जून २०२०ते जून २०२१ नंतर नोकर भरतीच्या वार्षिक ग्रोथ रॅंकिंगमध्ये बंगळूर (५० टक्के) टॉपवर आणि दिल्ली सर्वात खाली (४ टक्के) आहे. तर ७ टक्के वाढ होऊन चंदीगड व्यतिरिक्त टियर-२ शहरांमध्ये निगेटीव्ह ग्रोथ रिपोर्टमध्ये पाहायला मिळाली. जूनमध्ये फायनान्स अॅण्ड अकाऊंट्स (११ टक्के), हेल्थ केयर (१० टक्के) आणि एचआय अॅण्ड एडमिन (८ टक्के) या पदांवरील नोकरीमध्ये महिन्याची वाढ पाहायला मिळाली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3euYLpR
via nmkadda