
SSC Result link Website Crashed: दहावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. मात्र, निकालाच्या साइटवर ट्रॅफिक वाढल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल लागूनही तो दिसत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले आहेत. दरम्यान, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने यंदा निकालासाठी एमकेसीएलच्या दोन्ही वेबसाइट डिसकंटिन्यू केल्या आहेत. निकालासाठी यंदा ही नवी लिंक बोर्डाने दिली आहे. यासोबतच बोर्डाची नेहमीची अधिकृत लिंक www.mahahsscsscboard.in येथेही निकाल पाहता येईल, असे बोर्डाने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी, पालक निकालासाठी वारंवार या दोन्ही लिंकवर जात आहेत, पण त्या सुरू होत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rqPbJT
via nmkadda
0 टिप्पण्या