Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १७ जुलै, २०२१, जुलै १७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-17T09:47:36Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSC GD Constable Notification 2021: जीडी कॉन्स्टेबल पदाच्या २,५००हून अधिक जागांची भरती Rojgar News

Advertisement
GD Constable Notification 2021: प्रदीर्घ काळापासून एसएससी जीडी कांस्टेबल भरती परीक्षेच्या नोटिफिकेशनची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने जीडी कॉंस्टेबलच्या एकूण २५ हजारहून अधिक पदांवरील भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. नोटिफिकेश २०२१ नुसार केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), एनआयए, एसएसएफमध्ये कॉंस्टेबल पदाच्या एकूण २५ हजार २७१ जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर माहिती मिळू शकते. पूर्ण फॉर्म काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. तसेच ऑनलाइन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर आणि चलान फी जमा करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर आहे. पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे पात्रता प्रमाणपत्र आहे किंवा जे १ ऑगस्ट २०२१ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत तेच उमेदवार अर्ज करु शकतात. एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा २०२१ ची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. तर निवड केल्या गेलेल्या उमेदवारांना पे लेव्हल ३ प्रमाणे २१, ७०० ते ६९,१०० पर्यंत पगार देण्यात येणार आहे. SSC GD 2021 Notification: महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख- १७ जुलै २०२१ ऑनलाइन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख- ३१ ऑगस्ट २०२१ ऑनलाईन फीस जमा करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२१ ऑफलाइन चलान जनरेट करण्याची शेवटची तारीख- ४ सप्टेंबर २०२१ ऑफलाइन चलानद्वारे शुल्क भरण्याची तारीख- ७ सप्टेंबर २०२१ वयोमर्यादा जीडी कँस्टेबल भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. १ ऑगस्ट २०२१ ही वयोमर्यादेची कटऑफ आहे. याशिवाय आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VU1e6D
via nmkadda