Advertisement

SSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. सकाळी विभागीय आणि एकूण पास झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. दुपारी १ वाजल्यापासून राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना स्वत:चा निकाल पाहता येणार होता. पण तीन तास उलटून गेले तरी वेबसाइटवर निकाल पाहता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत. दरवर्षी निकाल लागताना वेबसाइट हॅंग होण्याची अडचण येते पण तीन तास झाले तरी यावर तोडगा निघत नसल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गातून प्रश्न विचारले जात आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची वेबसाइट ३ तासांहून अधिक वेळ हॅंग आहे. यासंदर्भात अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मंडळाकडून आलेले नाही. तसेच त्यांना संपर्क केला असता काही प्रतिसादही मिळाला नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अजून किती वेळ वाट पाहावी लागणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. एकावेळेस राज्यभरातील विद्यार्थी वेबसाइटवर आपला निकाल तपासायला जातात. त्यामुळे वेबसाइट हॅग होऊ शकते हे समजू शकतो पण तीन तासांहून अधिक वेळ झाला तरी त्यावर तोडगा काढला जात नाही, इतर काही पर्याय दिला जात नाही. कधीपर्यंत वेबसाइट सुरु होणार याबद्दल अधिकृत स्टेटमेंटदेखील दिले जात नाहीय. पुन्हा परीक्षा दरम्यान जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर समाधानी नसतील आणि आपली नापसंती बोर्डाकडे कळवतील त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा होणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देताना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. वेबसाइट सुरु झाल्यावर असा पाहा निकाल SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा तुमचा सीट नंबर टाइप करा आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका तुमच्या स्क्रीनवर निकाल दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिट काढून ठेवा कुठे पाहाल निकाल? https://ift.tt/2U7pMIW या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ihZgED
via nmkadda