Advertisement

Exam Date Announced: मागील दोन वर्षांपासून शिक्षक पात्रता परीक्षेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. २०१९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही परीक्षा झाली नव्हती. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मान्यता द्यावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली जात होती. राज्य सरकारने यावर सकारात्मक पाऊल उचलले असून शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. एका वर्षात साधारण ७ लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. दोन वर्ष परीक्षा न झाल्याने हा आकडा देखील वाढणार आहे. शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना यामुळे मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता देण्यात आली आहे. मागील दोन वर्षे शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन झाले नव्हते. सन २०१८-१९ नंतर आता परीक्षा होणार आहेत. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता शिक्षणविभागाकडून वर्तविली जात आहे. टिईटी अनिवार्य इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी(TET) अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत आणि कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने मागील आठवड्यात ६१०० शिक्षकांची भरती करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/372BmId
via nmkadda