TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

३० सप्टेंबरपर्यंत पदवी प्रथम वर्ष प्रवेश करा; UGC चे विद्यापीठांना निर्देश Rojgar News

विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission, ) चालू सत्रासह शैक्षणिक कॅलेंडर आणि सोबत नव्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रियेच्या तारखांची घोषणाही केली आहे. यानुसार, अंतिम वर्षाच्या परीक्षा ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण केल्या जातील. यूजीसीने यासंबंधी नोटिफिकेशन जारी केले आहे. यात म्हटले आहे की विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया २०२१ साठी विविध विद्यापीठांमधील यूजी प्रवेश प्रक्रिया सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य बोर्डांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नवे शैक्षणिक सत्र १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की सर्व राज्य मंडळांच्या परीक्षांसह सीबीएसई, आयसीएसई परीक्षांचे निकाल ३१ जुलै २०२० पर्यंत लागतील. विद्यापीठांनी ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी आणि १ ऑक्टोबर २०२१ पासून नवे सत्र सुरू करावे असे निर्देश यूजीसीने दिले आहेत. रिक्त जागांवरील प्रवेशांसाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल विलंबाने लागणार असतील तर त्यांनी १८ ऑक्टोबरपर्यंत प्रमाणपत्र उपलब्ध करावी, असेही विद्यापीठ अनुदान आयोगोने म्हटले आहे. या व्यतिरिक्त अंतिम वर्ष सत्र परीक्षा ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. आयोगाने म्हटले आहे की कोविड प्रोटोकॉलअंतर्गत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा पूर्ण कराव्यात. यूजीसीने असेही सांगितले आहे की महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ ३१ ऑक्टोबर पर्यंत प्रवेश रद्द करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नाहीत. त्यानंतर विद्यापीठ पैसे रद्द करू शकते. यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3B7D1tL
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या